न भेटताच खतरनाक कैद्याच्या प्रेमात पडली सायकॉलॉजीची विद्यार्थीनी, छातीवर काढला त्याच्या नावाचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:51 AM2022-04-01T11:51:02+5:302022-04-01T11:51:42+5:30
कुणाला कुणाचा आवाज आवडतो तर कुणी कुणाच्या डोळ्यांवर प्रेम करू लागतं. कुणाला कुणाचं मन आवडतं तर कुणाला पर्सनॅलिटी. अशीच एक अजब घटना इंग्लंडमधून समोर आली आहे.
प्रेम एक अशी गोष्ट आहे जे कोणत्याही वयात कुणालाही कुणाशी होऊ शकतं. प्रेमात ना जात पाहिली जात ना धर्म. त्याला सीमा नसतात. कुणाला कुणाचा आवाज आवडतो तर कुणी कुणाच्या डोळ्यांवर प्रेम करू लागतं. कुणाला कुणाचं मन आवडतं तर कुणाला पर्सनॅलिटी. अशीच एक अजब घटना इंग्लंडमधून (England) समोर आली आहे.
'द मिरर' च्या रिपोर्टनुसार, सायकॉलॉजीची एक ब्रिटीश विद्यार्थीनी एका खतरनाक कैद्याच्या प्रेमात पडली. सर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, तरूणी या कैद्याला न भेटताच त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर तरूणीने कैद्यासाठी असं काही केलं जे वाचून सगळेच हैराण झाले. या तरूणीने खतरनाक गुन्हेगाराच्या नावाचा टॅटू तिच्या छातीवर काढला. ही तरूणी ब्रिटनच्या ब्रिस्टलमध्ये राहणारी आहे.
जॅकी मॅकडॉनल्ड नावाची ३० वर्षीय सायकॉलॉजी विद्यार्थीनीने २०१९ मध्ये 'Write a Prisoner' मध्ये साइन अप केलं होतं. यानंतर तिने ३१ वर्षीय अलेक्झांडर नावाच्या कैद्यासोबत बोलणं सुरू केलं होतं. हा कैदी एका दरोड्याच्या आरोपात तुरूंगात कैद होता. बोलता बोलता जॅकी कैद्याच्या आवाजाच्या प्रेमात पडली. तिला त्याचा आवाज इतका आवडला की, ती त्याच्या प्रेमात पडली.
सायकॉलॉजी शिकणारी तरूणी कैद्याच्या बोलण्यावर इतकी फिदा झाली की, ३ महिन्याच्या आतच ती त्याला न भेटता आणि त्याला न बघता त्याला मन देऊन बसली. इतकंच नाही तर तिने त्याच्या नावाचा टॅटू आपल्या छातीवर काढला. त्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी अमेरिकेला गेली. एकमेकांना पहिल्यांदाच भेटता कैद्याने तुरूंगात तरूणीला प्रपोज केलं. त्यानंतर दोघांनी एंगेजमेंट केली. जॅकी म्हणाली की, अलेक्झांडर २०२५ मध्ये तुरूंगातून बाहेर येईल. त्यानंतर दोघे लग्न करतील.