पाळलेल्या कुत्र्यानं मालकिनीच्या तोंडात केली पॉटी, तब्येत बिघडताच रुग्णालयात व्हावं लागलं भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 04:45 PM2022-09-27T16:45:28+5:302022-09-27T16:46:05+5:30

संबंधित वृत्तानुसार, झोपताना अमँडाचे तोंड उघडेच राहिले. त्यांना अचानकपणे आपल्या तोंडात एक ओला पदार्थ असल्यासारखे जाणवले अन्...

England Viral dog pooed in woman mouth while sleeping woman admit in hospital for gastro intestinal infection | पाळलेल्या कुत्र्यानं मालकिनीच्या तोंडात केली पॉटी, तब्येत बिघडताच रुग्णालयात व्हावं लागलं भरती

पाळलेल्या कुत्र्यानं मालकिनीच्या तोंडात केली पॉटी, तब्येत बिघडताच रुग्णालयात व्हावं लागलं भरती

googlenewsNext

लोक आपल्या पाळलेल्या कुत्र्यावर एवढे प्रेम करतात, की ते त्यांना आपल्या अंथरुणावर घेऊन झोपायलाही कमी करत नाहीत. पण, जनावरांना अशा वातावरणात राहण्याची सवय नसते, हे त्यांना कळतच नाही. एवढेच नाही, तर कुत्रा आजारी असताना त्याच्या शेजारी झोपणेही योग्य नाही. कारण एखादा आजार त्यांच्या माध्यमाने मानवालाही होऊ शकतो. इंग्लंडमध्ये (Dog pooed in woman mouth England news) राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या आजाराकडे दुर्लक्ष केले आणि त्याला आपल्यासोबतच अंथरुनावर झोपवले. मग काय, कुत्र्याने असा काही कारनामा केला, की त्याच्या मालकिनीला थेट 3 दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागले.

डेली स्टार वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अमँडा गोमो (Amanda Gommo) असे या महिलेचे नाव आहे. 51 वर्षांच्या अमँडा गोमो यांना 3 मुले आहेत. त्या इंग्लंडच्या ब्रिसल (Bristol, England) येथे राहतात. त्यांच्या मुलीने घरात चुवावा (chihuahua) ब्रीडचा एक कुत्ता पाळला आहे. बेले असे या कुत्र्याचे नाव आहे. हे कुत्रे आकाराने फारच छोटे असतात. अमँडा गोमो या त्याला आपल्यासोबत घेऊन झोपल्या होत्या. संबंधित वृत्तानुसार, झोपताना अमँडाचे तोंड उघडेच राहिले. त्यांना अचानकपणे आपल्या तोंडात एक ओला पदार्थ असल्यासारखे जाणवले. त्या लगेचच झोपेतून जाग्या झाल्या. तेव्हा, आपल्या कुत्र्याने आपल्या तोंडावर पॉटी केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कुत्र्याने महिलेच्या तोंडात केली पॉटी -
घडलेला प्रकार लक्षात येताच अमँडा बाथरूमकडे पळाल्या. मात्र, तेव्हा त्यांचा मुलगा आंघोळ करत होता. यामुळे त्यांना तोंड धुण्यास काहीसा वेळ लागला आणि घाण त्यांच्या पोटापर्यंत गेली. यानंतर त्यांनी अनेकवेळ तोंड धुतले. ब्रश केला. मात्र, त्यांच्या तोंडातून त्या घाणीचा वास आणि तिची चव जात नव्हती. यावर त्यांच्या मुलीने संबंधित कुत्र्याला तत्काळ डॉक्टरांकडे नेले. तेव्ह कुत्र्याला बॅक्टेरिअल इंफेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि काही त्याला काही अँटीबायोटिक्स दिले.

महिलेला 3 दिवस व्हाव लागलं अॅडमिट - 
अमँडा यांची लक्षणंही कुत्र्यासारखीच झाली होती. म्हणजेच त्यांचेही पोट लगेच खराब झाले आणि अनेक वेळा टॉयलेटला जावे लागले. तेव्हा त्याही डॉक्टरकडे गेल्या आणि काही औषधी आणली. मात्र, हे इन्फेक्शन वाढल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावली. यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कुत्र्याच्या पॉटीमुळे गॅस्ट्रो इंटस्टाइनल इंफेक्शन (gastro intestinal infection) झाले होते. यामुळे त्यांनी तीन दिवस रुग्णालयातच राहावे लागले.
 

Web Title: England Viral dog pooed in woman mouth while sleeping woman admit in hospital for gastro intestinal infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.