40 लाखांची नोकरी सोडून महिला बनली सफाई कामगार, Instagram युजरला पाहून घेतला निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:23 PM2021-12-28T17:23:39+5:302021-12-28T17:24:24+5:30

बर्टनचे 2017 मध्ये प्रमोशन झाले. यानंतर तिचा पगार सुमारे 40 लाख रुपये झाला.  होता. पण...

England Woman left the job of worth 40 lakh rupees and become cleaner | 40 लाखांची नोकरी सोडून महिला बनली सफाई कामगार, Instagram युजरला पाहून घेतला निर्णय!

40 लाखांची नोकरी सोडून महिला बनली सफाई कामगार, Instagram युजरला पाहून घेतला निर्णय!

googlenewsNext


एका महिलेने 40 लाखांची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि तिने सफाईचे काम करायला सुरुवात केली. क्लेअर बर्टन (Claire Burton) असे या महिलेचे नाव आहे. ती ब्रिटनची असून, क्लिनर होणे हे कॉर्पोरेट नोकरीमध्ये ईमेल लिहिण्यापेक्षा अगदी वेगळे जग आहे. तसेच हा निर्णय आपल्या करिअरचा सर्वात चांगला निर्णय होता, असे तिने म्हटले आहे.

'द सन'ने दिलेल्या वत्तानुसार, लाखो रुपयांची नोकरी सोडणारी क्लेयर बर्टन सध्या 6 ग्राहकांकडे सफाईचे काम करते. हे काम तिने इंस्टाग्राम युजर मिस हिंच (Mrs Hinch) यांच्या कडेपाहून निवडले. बर्टनने ऑगस्ट 2001 मध्ये हाय-स्ट्रीट बँकेसाठी ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिची कमाई दीड लाख रुपये एवढी होती. याचदरम्यान तिने सप्टेंबर 2003 मध्ये बॉयफ्रेंड डेव्हसोबत लग्न केले.

वडिलांचा मृत्यू, पतीसोबत घटस्फोट - 
बर्टनचे 2017 मध्ये प्रमोशन झाले. यानंतर तिचा पगार सुमारे 40 लाख रुपये झाला.  होता. पण त्याच वर्षी बर्टनच्या वडिलांचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. एका वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये तिचे लग्नही तुटले तिचा घटस्फोट झाला. या सर्व प्रकाराने तिला मोठा धक्का बसला.

स्वतःला अशा प्रकारे मजबूत बनवलं -
क्लेअर बर्टन सांगते, 'तेव्हा मला वाटले होते, की आता आयुष्य संपले. पुढचे अनेक महिने मी एकटीच होते. मात्र, एका गोष्टीची मला अनपेक्षितपणे मदत झाली आणि ती गोष्ट म्हणजे स्वच्छता. बर्टनने सांगितले की, ज्या कामाचा मला नेहमी तिरस्कार वाटत असे आणि जे काम मी इतरांकडून पैसे देऊन करून घेत होते, त्याच कामाने मला धीर दिला.

बर्टन म्हणते, 'मी इंस्टाग्रामवर मिसेस हिंच यांना पाहिले आणि चार तास साफसफाई केल्याने शांतता मिळते, असे मला जाणवले. ते एक प्रकारचे ध्यानच होते. हळू-हळू जानेवारी 2019 पर्यंत, एका मार्गदर्शकाच्या मदतीने मी स्वतःला या धक्क्यातून सावरले.

नोकरी सोडली आणि साफसफाईलाच काम बनवले -
कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात घरातून काम करताना बर्टनने साफसफाईचेही काम केली. यातून तिला आनंद मिळू लागला, यानंतर आपण हेच काम का करू नये? असे तिला वाटले.  मग काय, बर्टनने नोकरी सोडली आणि पूर्णवेळ क्लिनर बनली. आता ती केवळ स्वतःचे घरच नाही तर इतरांची घरेही स्वच्छ करते. तिच्याकडे आता सहा ग्राहक आहेत.

मात्र, आता तिला तिचा खर्च कमी करावा लागणार आहे, कारण आता तिचा पगार पूर्वीसारखा नाही. बर्टन म्हणते, की माझा पगार ७० टक्क्यांहून अधिक कमी झाला आहे. ही एक मोठी घसरण आहे. पण, माझे उत्पन्न वाढत आहे आणि माझ्या खर्चासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. मी माझे स्वप्न जगत आहे.

Web Title: England Woman left the job of worth 40 lakh rupees and become cleaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.