झोपेतच शॉपिंग करते ही महिला, असं करण्याचं कारण वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 01:38 PM2024-06-08T13:38:11+5:302024-06-08T13:38:49+5:30
42 वर्षीय या महिलेचं नाव केली नाइप्स असून तिला एक अजब आजार आहे. केलीला एक झोपेसंबंधी एक रेअर आजार आहे.
महिलांना शॉपिंग करणं खूप आवडतं असं म्हटलं जातं. वेगवेगळे उत्सव असतील, एखादा इव्हेंट असेल किंवा लग्न असेल महिला शॉपिंग करताना दिसतात. पण तुम्ही कधी कुणाला झोपेत शॉपिंग करताना पाहिलं नसेल. तुम्ही म्हणाला झोपेत कोण कसं शॉपिंग करेल? पण इंग्लंडमधील एक महिला असंच करते. ती झोपेत शॉपिंग करते आणि याच नादात 3 लाखांपेक्षा जास्त रूपये खर्चही केले आहेत.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 42 वर्षीय या महिलेचं नाव केली नाइप्स असून तिला एक अजब आजार आहे. केलीला एक झोपेसंबंधी एक रेअर आजार आहे. ज्यामुळे ती झोपेतच शॉपिंग करते. ती झोपेतच रात्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर जाऊन आपल्या कार्ट वस्तू अॅड करते. त्यानंतर झोपेतच त्यांची ऑर्डरही देते. या नादात तिने 3 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्चही केले आहेत.
साउथ वेस्ट न्यूज सर्विससोबत बोलताना केलीने सांगितलं की, तिला याची फार चिंता असते की, ती रात्री झोपेत काय करेल. कोणत्या वस्तू पैसे खर्च करेल. 2018 मध्ये काही टेस्ट केल्यानंतर तिला पॅरासोमनिया असल्याचं समजलं. ही एक अशी कंडीशन आहे ज्यात व्यक्ती झोपेत असताना वेगळे वागू लागतात. येल मेडिसिननुसार पॅरासोमनियाने ग्रस्त व्यक्ती झोपेत चालूही लागते, बोलू लागते, जेवण करते किंवा इतरही काही गोष्टी करतात. पण त्यांना ते काय करत आहे हे माहीत नसतं. कारण त्यांचा मेंदू अर्धा जागा असतो.
गेल्या काही वर्षामध्ये केलीने अनेक वेबसाइटवरून वस्तू ऑर्डर केल्या आणि जेव्हा वस्तू घरी येत होत्या तेव्हा तिची झोप उडत होती. यात वस्तूंमध्ये एक प्लास्टिकचा फुल साइज बास्केटबॉल कोर्ट होता ज्यात नेट, पोल इत्यादी वस्तू होत्या. त्याशिवाय पेंट, बुक, मीठ आणि प्ले हाऊस, फ्रिज, टेबल, चॉकलेट अशा वस्तू होत्या. तिच्या फोनमध्ये क्रेडिट कार्ड डीटेल्स आधीच सेव्ह होते. त्यामुळे ते ते पुन्हा टाकण्याची गरज नव्हती. एकदा तर तिने आपले बॅंक डिटेल्सही काही लोकांना सांगितले होते. ती झोपेतून उठली तर अकाऊंटमधून पैसे गायब दिसले. काही वस्तू तिने परत केल्या तर काही तिच्याकडेच आहेत.