महिलेला विचित्र आजार, स्वत:ला रूममध्ये बंद करून घेते आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 03:54 PM2024-11-16T15:54:51+5:302024-11-16T16:13:07+5:30

हा आजार एक मानसिक स्थिती आहे. ज्यात व्यक्तीने अनेकदा डोळे बंद करते किंवा एका जागेवर स्थिर होते.

England woman with rare sleep disorder | महिलेला विचित्र आजार, स्वत:ला रूममध्ये बंद करून घेते आणि मग...

महिलेला विचित्र आजार, स्वत:ला रूममध्ये बंद करून घेते आणि मग...

इंग्लंडच्या डेवोनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला विचित्र आजाराने ग्रासलं. या आजारामुळे ती स्वत:ला रूममध्ये बंद करून घेते. या आजाराला कॅटाटोनिया असं म्हणतात. ज्यात व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक रूपाने निर्जीव असल्यासारखं वाटतं आणि अचानक एखाद्या कारणाने स्वत: रूममध्ये बंद करून घेतात. ते भीती आणि तणावामुळे कुणाच्याही संपर्कात येत नाही.

हा आजार एक मानसिक स्थिती आहे. ज्यात व्यक्तीने अनेकदा डोळे बंद करते किंवा एका जागेवर स्थिर होते. महिलेने तिच्या स्थितीबाबत सांगितलं की, ती कोणत्याही प्रकारच्या आवाजामुळे, कल्लोळामुळे घाबरते आणि स्वत:ला रूममध्ये बंद करून घेते. जेणेकरून तिला सुरक्षित वाटावं.

झोपेत शारीरिक संबंध

नुकताच आणखी एका ५० वर्षीय महिलेने तिच्या दुर्मिळ आजाराचा खुलासा केला. या आजारात ती झोपेत तिच्याजवळ झोपलेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवू लागते. ही स्थिती केवळ महिलेसाठीच नाही तर तिच्यासोबत झोपलेल्या व्यक्तींनाही असहज करणारी आहे. कारण हे सगळं झोपेत होतं आणि व्यक्ती या स्थितीला पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही. महिलेच्या पतीने सांगितलं की, जेव्हाही तिच्या आजूबाजूला कुणी झोपलं तर ती असं वागताना दिसून आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, महिला २०२१ मध्ये डॉक्टरांना भेटल्यावर या गंभीर आजाराबाबत समजलं. डॉक्टरांनी तिला समजावून सांगितलं. ही महिला एक कंटेंट क्रिएटर आणि मॉडल आहे. तिच्या जीवनात आलेल्या बदलामुळे तिचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रभावित झालं. अशात या स्थितीचा सामना करण्यासाठी तिने जागरूकता पसरवण्याचा निर्णय घेतला.

रात्री बाहेर जाताना घेते काळजी

महिलेने सांगितलं की, जेव्हाही कधी रात्री मित्रांसोबत बाहेर रहायचं असतं तेव्हा विशेष काळजी घ्यावी लागते. झोपण्याआधी दरवाजे लॉक करून घेते. जेणेकरून झोपेतून उठून ती बाहेर जाऊ नये किंवा दुसऱ्याच्या रूममध्ये जाऊ नये. महिला म्हणाली की, रात्री झोपेत शारीरिक संबंध ठेवण्याशिवाय ती वेगवेगळी कामेही करू लागते. कुणालाही रात्री मेसेज पाठवते. पण सकाळी मात्र तिला काहीच लक्षात राहत नाही. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी खरं आहे.

Web Title: England woman with rare sleep disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.