धबधब्याच्या मधोमध पाण्यात तेवत असते ज्योत, वैज्ञानिक अजूनही शोधू शकले नाही यामागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:10 PM2021-11-10T15:10:51+5:302021-11-10T15:11:27+5:30
जगात असा एक धबधबा आहे, जिथं (Continuous flame burns in the middle of waterfall) सतत पाणी वाहत असूनही त्याच्या मधोमध एक ज्योत सतत तेवत असते. निसर्गात अनेकदा असे काही चमत्कार घडतात, की त्यामागचं कारण शोधणं अनेकदा अवघड असतं.
जगात असा एक धबधबा आहे, जिथं (Continuous flame burns in the middle of waterfall) सतत पाणी वाहत असूनही त्याच्या मधोमध एक ज्योत सतत तेवत असते. निसर्गात अनेकदा असे काही चमत्कार घडतात, की त्यामागचं कारण शोधणं अनेकदा अवघड असतं. जोपर्यंत अशा घटनांचं वैज्ञानिक कारण समोर येत नाही, तोपर्यंत (Magic of nature) निसर्गाचा चमत्कार म्हणूनच अशा घटनांकडं पाहिलं जातं. निसर्गाचा असाच एक (Natural magic in America) चमत्कार आहे अमेरिकेत.
धबधब्याच्या मधोमध ज्योत
पाणी आणि आग यांचं एकमेकांशी विरोधाचं नातं. पाण्याने आग विझते, असा सर्वसामान्य अनुभव. मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असा एका धबधबा आहे, जिथं पाण्याच्या मधोमध सतत आग तेवत असते. आगीची एक ज्योत सतत या धबधब्यात प्रज्वलित झाल्याचं दिसून येतं.
एटर्नल फ्लेम फॉल
या धबधब्याचं नावच त्यात तेवणाऱ्या ज्योतीवरून पडलं आहे. हा धबधबा वर्षाचे बाराही महिने प्रवाही असतो. सतत पाणी वाहत असूनदेखील तिथं आगीची ज्योत प्रज्वलित होत राहते. यामागे नेमकं काय कारण असावं, याचं उत्तरही गेल्या अनेक वर्षांपासून शोधलं जात आहे. निसर्गाचा हा अद्भूत नजारा पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो.
जगभरातून येतात पर्यटक
निसर्गाची ही कमाल पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक या धबधब्यावर गर्दी करतात. पाण्यात आग लावणं, ही आतापर्यंत एक कवीकल्पना मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात हे घडू शकतं, याची प्रचिती या धबधब्यावर गेल्यावर येते.
हे आहे शास्त्रीय कारण
धबधब्याच्या त्या विशिष्ट भागातून मिथेन गॅस बाहेर येत असल्याचा दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी कुणीतरी तिथं ज्योत पेटवली असावी. मात्र त्यानंतर सातत्यानं तिथून मिथेन बाहेर पडत असल्यामुळे ही आग विझलेलीच नसल्याचा दावा काही शास्त्रज्ञ करतात. याबाबत अधिक संशोधन अद्यापही सुरूच आहे.
दैवी शक्ती असल्याची भावना
या ज्योतीमागे दैवी शक्ती असल्याची भावनाही काही भाविक मंडळी व्यक्त करतात. जोपर्यंत ही ज्योत तेवत राहते, तोपर्यंत या भागाला निसर्गापासून कुठलाही धोका नसल्याचं मानलं जातं. सर्व काही आलबेल असल्याचा संकेत म्हणूनही या ज्योतीकडं पाहिलं जातं.