'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:50 PM2023-01-27T12:50:58+5:302023-01-27T12:51:52+5:30
1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले, पण या देशात अजून नवीन वर्ष झालेलं नाही.
Journey to Past: 1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले. 26 जानेवारी 2022 रोजी भारताने 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. पण, जगात एक असा देश आहे जिथे नवीन वर्ष अजून आलेलं नाही. या आफ्रिकन देशात सप्टेंबर 2022 मध्ये नवीन वर्ष सुरू होईल. एवढंच नाही तर या देशात 2022 नाही तर 2015 सुरू आहे. आपल्या कॅलेंडरमुळे हा देश इतर जगाच्या तुलनेत खूप मागे पडला आहे.
इथिओपियाचे कॅलेंडर बघता असे म्हणता येईल की, जर तुम्हाला भुतकालात जायचे असेल तर या आफ्रिकन देशात जा. आता असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की, हा देश जगाच्या तुलनेत 7 वर्षांनी मागे का आहे? तर, इथिओपियाचे कॅलेंडर उर्वरित जगापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. ज्युलियस सीझरने बनवलेले ज्युलियन कॅलेंडर या आफ्रिकन देशात चालते. त्यामुळे इथिओपियामध्ये 12 ऐवजी 13 महिन्यांचे वर्ष आहे. तर, जगभरात ग्रेगोरियन कॅलेंडरच्या आधारावर तारीख निश्चित केली जाते. संपूर्ण जगात इथिओपिया हा एकमेव देश आहे, ज्याने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारण्यास नकार दिला.
ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले जात नाही
ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरुवात पोप ग्रेगरी यांनी 13 व्या वर्षी 1582 मध्ये केली होती. त्यांनी ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा केली आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरू करण्याची व्यवस्था केली. अनेक देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारण्यास नकार दिला आणि फक्त जुन्या ज्युलियन कॅलेंडरचे पालन करण्याचा निर्णय घेतला. इथिओपिया हा देखील त्यापैकी एक देश आहे. ज्युलियन कॅलेंडरमध्ये 13 महिन्यांचे वर्ष असते. प्रत्येक महिन्यात फक्त 30 दिवस असतात. ज्यामध्ये, 13 महिन्याला Pagyume म्हणतात. ज्युलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडरवर विश्वास ठेवतात त्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेचा अंदाज वेगळा केला आहे. त्यामुळे दोन्ही कॅलेंडरमध्ये हा फरक दिसून येतो.