ना बॉटल हटेगी, ना...; फेविकॉलचा जबरदस्त 'गोल'; Cristiano Ronaldo Vs. कोका कोला 'सामन्या'त भन्नाट 'फ्री-किक'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:08 PM2021-06-18T17:08:34+5:302021-06-18T17:23:42+5:30
'हाय नी मेरा कोका कोका..' म्हणत फेविकॉलनं घेतली फिरकी. पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोनं कोकाकोलाच्या बाटल्या हटवत पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.
Euro 2020: पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडाला नाराज दिसला. त्यानं खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या (CocaCola) दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. त्यानंतर त्यानं उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्ला दिला. कोका कोला हे यूरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. ही पत्रकार परिषद संपेपर्यंत कोका कोलाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. यानंतर फेविकॉल आणि अमूल या ब्रान्डनं मजेशीर फिरकी घेतली.
फेविकॉलनं (Fevicol) आपल्या जाहिरातीत प्रेस कॉन्फरन्सच्या टेबलवर लोकप्रिय असलेल्या अॅडहेसिव्हच्या दोन बॉटल्स ठेवलेल्या दिसत आहेत. तसंच यासोबत त्यांनी 'न बोतल हटेगी, न वॅल्युएशन घटेगी' असं मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. फेविकॉलनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही जाहिरात शेअर करत त्यात 'हाय नी मेरा कोका कोका कोका', असं कॅप्शन देत मजेशीर फिरकी घेतली आहे. यानंतर अमूलनंही एक जाहिरात शेअर करत 'नेव्हर बॉटलिंग असाईड' म्हणत मजेशीर प्रतिक्रिया दिली.
Haye ni mera Coka Coka Coka Coka Coka#Euro2020#Ronaldo#MazbootJod#FevicolKaJodpic.twitter.com/lv6YWrgfxB
— Fevicol (@StuckByFevicol) June 17, 2021
#Amul Topical: About beverages and football... pic.twitter.com/CNrNRY5KFV
— Amul.coop (@Amul_Coop) June 17, 2021
रोनाल्डो सॉफ्ट ड्रिंकपासून दूर
रोनाल्डो हा फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच वयाच्या ३६ व्या वर्षीही तो मैदानावर युवा खेळाडूंप्रमाणे खेळ करू शकतो. तो दिवसाला सहा वेळा जेवतो, त्यात फळ, भाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. त्याशिवाय तो कसून सरावही करतो.
२०२० च्या एका पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोनं त्याच्या मुलाला सॉफ्ट ड्रींक्स पिताना व चिप्स खाताना पाहिले होते आणि त्यानंतर त्यानं नाराजी व्यक्त केली होती. पोर्तुगाल संघाचे पाच युरो स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा तो पहिला खेळाडू आहे. याशिवाय यूरो स्पर्धेत सर्वाधिक गोल्सचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याला अली डाईल यांचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल्सचा विक्रम मोडण्यासाठी सहा गोल्सची गरज आहे.