'मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 11:21 AM2021-04-20T11:21:30+5:302021-04-20T11:27:41+5:30
यावर्षी फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी खोपडीला जेरबंद केलं आणि त्याच्या चॅलेंजला सडेतोड उत्तर दिलं होतं.
'मला देवही पकडू शकत नाही'...असं खूलं चॅलेंज कुख्यात गुन्हेगार 'खोपडी'ने मुंबई पोलिसांना दिलं होतं. हा एका असा गुन्हेगार आहे जो स्वत:ला कायद्याच्या वर समजत होता. त्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स त्यााल महागात पडला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. कसा ते जाणून घेऊ...
पप्पू हरिशचंद्र उर्फ खोपडीवर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कित्येक केस दाखल होत्या. त्याच्यावर पवई, साकीनाका, एमआयडीसी आणि आरेमद्ये वेगवेगळ्या केसेस होत्या. मुंबईच्या पवई भागात राहणारा खोपडी २०१३ पासून फरार होता. (हे पण वाचा : भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!)
खोपडी इतका बिनधास्त होता याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्याने त्याच्या एका साथीदाराच्या माध्यमातून पोलिसांना सूचना पाठवली होती की, 'त्याला देवही पकडू शकत नाही तर मुंबई पोलिसांनी तर मला विसरूनच जावं'. खोपडीचं हे चॅलेंज पोलिसांनी स्वीकारलं. असे म्हणतात की, गुन्हेगार कितीही हुशार का असेना तो कायद्याच्या नजरेतून वाचू शकत नाही.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी खोपडीला जेरबंद केलं आणि त्याच्या चॅलेंजला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यावेळी मुंबई पोलिसचे एक सब-इन्स्पेक्टर उल्हास कोहल्म यांनी सांगितले होते की, आम्हाला आमच्या माणसाकडून खोपडीची टीप मिळाली होती. पोलिसांना टीप मिळाली होती की, खोपडी एका दरोड्याचा प्लॅन करत आहे. हा दरोडा रॉयल पाम भागात टाकला जाणार आहे. त्यानंतर पोललिसांनी सापळा रचला.
पोलीस अधिकाऱ्यांच्या एका टीमने साध्या वेशात खोपडीवर सतत लक्ष ठेवलं. याचा परिणाम हा झाला की, खोपडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तसेच त्याच्याकडून देशी कट्टा आणि काडतूसही ताब्यात घेतले.