बाबो! इथे माणसांपेक्षा जास्त आहे कुत्र्यांची कमाई; किंमत ऐकून डोळे उघडेच राहतील....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 04:36 PM2020-04-02T16:36:41+5:302020-04-02T16:47:26+5:30
तुमचा विश्वास बसणार नाही पण या गावात माणसंच नाही तर कुत्रे करोडपती आहेत.
गुजरातच्या मेहसाणामधील पंचोट गावात एक खास ठिकाण आहे. हे ठिकाण सगळ्यांचंच आकर्षण आहे. तुम्ही माणसं करोडपती असतात, जमीनदार असतात. असं ऐकलं असेल. तुमचा विश्वास बसणार नाही पण या गावात माणसंच नाही तर कुत्रे करोडपती आहेत. एका ट्रस्टच्या नावाने असलेल्या जमिनीवरून कुत्रे करोडो रुपये कमावतात.
मागिल दहा वर्षातच्या काळाच मेहसाणा बायपास तयार झालं आहे. त्यामुळे याठिकाणच्या जमिनाीचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र याचा फायदा कुत्र्यांना होत आहे. या गावाच्या ट्रस्टची २१ बिघा जमिन आहे. ३.५ कोटी रुपये प्रतिबीघा आहे. या ट्रस्टकडे जवळपास ७० कुत्रे आहेत. प्रत्येक कुत्र्यांच्या वाट्याला कमीत कमी १ करोड रुपये येतातच. या ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांच्यामते आपल्या उत्पन्नाचा हिस्सा कुत्र्यांना देण्याची परंपरा फार जुनी आहे.
या परंपरेची सुरूवात मोठ्या खान्दानाने दान दिलेल्या लहानश्या जमीनीच्या तुकड्यापासून करण्यात आली होती. त्यावेळी जमिनीच्या किमती जास्त नव्हत्या. जवळपास ७० वर्षींपूर्वी ही जमिन ट्रस्टकडे आली होती. जसंजसं गावाचा विकास होत गेला तसतसं जमिनीच्या किमती वाढतं गेल्या. या जमिनीतून होत असलेल्या कमाईच्या पैशातून गावातील कुत्रे आणि अन्य प्राणी, पक्षी यांची काळजी घेतली जाते.
या गावचे लोक फक्त कुत्र्यांचीच नाही तर इतर प्राण्यांची आणि पक्षांची सुद्धा काळजी घेतात. या ट्रस्टला प्रत्येकवर्षी ५०० किलो अन्नधान्य दान मिळतं. यातून ते प्राणिमात्रांची देखभाल करतात. प्राणी, पक्षांच्या उपचारासाठी सुद्धा या ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे.