मनुष्यांचा पहिला किस 4 हजार 500 वर्ष जुना, समोर आला मोठा पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:48 PM2024-03-02T15:48:03+5:302024-03-02T15:48:09+5:30
एका शोधातून मनुष्यांच्या पहिल्या किसबाबत माहिती समोर आली आहे.
इतिहासातील अनेक गोष्टी समोर आणण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक शोध करत असतात. यामुळे जुनी सभ्यता आणि संस्कृती सोबतच त्यावेळी लोक कसे राहत होते याबाबतही माहिती मिळते. असंच एका शोधातून मनुष्यांच्या पहिल्या किसबाबत माहिती समोर आली आहे.
या शोधानुसार, जगात सगळ्यात आधी एका महिलेत आणि पुरूषांमध्ये पहिला किस 4500 वर्षाआधी झाला होता. याचे पुरावे समोर आले आहेत. याआधी असं मानलं जात होतं की, पहिला किस 3500 वर्षाआधी झाला होता.
जर्नल सायन्समध्ये प्रकाशित एका शोधानुसार, हा शोध मध्य पुर्वाचाच्या एका प्राचीन स्थानावर झाली. यातून मेसोपोटामिया समाजातील किसच्या पुराव्यांकडे इशारा करतात.
संशोधकांनी या गोष्टीचे पुरावेही दिले आहेत की, तोंडाला फोडं येण्यासारख्या समस्यांमागे किस करण हेच कारण असू शकतं. पहिल्या शोधातून समोर आलं होतं की, किस करण्याचा पहिला पुरावा 1,500 ईसवी सन पूर्ण प्राचीन भारतातील होता. पण नवीन शोध आणि प्राचीन मेसोपोटामिया ग्रंथातून समजलं की, ही मध्य पूर्वेत एक रोमॅंटिक प्रथा होती.
डेनमार्कच्या कोपेनहेगन यूनिवर्सिटीमध्ये मेसोपोटामिया इतिहासाचा एक्सपर्ट डॉ. ट्रॉल्स पंक आर्बोल म्हणाले की, प्राचीन मेसोपोटामिया सध्याच्या इराक आणि सीरियामध्ये यूफ्रेट्स आणि टायग्रिस नद्यांमध्ये होतं.
तेव्हा लोक मातीच्या भांड्यांवर कीलाकार लिपी लिहित होते. यातील अनेक भांडी आजही चांगली आहेत. त्यावरून स्पष्टपणे समजतं की, प्राचीन काळात किस एक रोमॅंटिक भाग मानला जात होता.