बॉसने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून थेट गुंडगिरीवरच आला; कर्मचाऱ्यानं 'असा' घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:19 PM2021-01-03T17:19:21+5:302021-01-03T17:34:53+5:30

Trending Viral News in Marathi : आपल्या आधीच्या कंपनीतील बॉसला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तेव्हा त्यांनी  स्वीकारी नाही. याच रागात त्यानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

Ex boss did not accept facebook friend request man threaten to kill him in north dakota america | बॉसने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून थेट गुंडगिरीवरच आला; कर्मचाऱ्यानं 'असा' घेतला बदला

बॉसने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून थेट गुंडगिरीवरच आला; कर्मचाऱ्यानं 'असा' घेतला बदला

Next

(Image Credit- AP Photo/Jenny Kane, File)

सध्या सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्ती एक्टीव्ह असते. इतरांच्या आयुष्यात काय सुरू आहे. हे कुतूहलने जाणून  घेण्यासाठी फेसबूक, वॉट्सएप, इन्स्टाग्रामवर लोक एकमेकांशी कनेक्ट होतात. पण तुम्ही पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणी मुद्दाम एक्सेप्ट केली नाही तर कसं वाटेल? अनेकजण रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही  केली तर दुर्लक्ष करतात. असाच काहीसा प्रकार एका माणसाबरोबर घडला. तुमचा विश्वास बसणार नाही पण या माणसानं जेव्हा आपल्या आधीच्या कंपनीतील बॉसला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तेव्हा त्यांनी  स्वीकारी नाही. याच रागात त्यानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ

The Williston Herald च्या रिपोर्ट्नुसार जेव्हा २९ वर्षीय कालेब बूरकेझनं  ख्रिसमस आणि न्यू ईअरच्या निमित्ताने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तेव्हा त्याला बॉसकडून कोणताही रिप्लाय मिळाला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार यानंतर त्यानं आपल्या बॉसला धमकीचे मेसेज पाठवायला सुरूवात केली. 'माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा, नाहीतर मारून टाकेन. ' असा मेसेजही त्याने केला होता. 

खरं की काय? रोज ११५ समोसे अन् १२ लीटर कोल्डड्रिंक्स प्यायचा, बटर चिकन खाता खाता आलं मरण

असा मेसेज पाठवूनही जेव्हा रिक्वेस्ट स्वीकारली नाही तेव्हा एक ट्रक घेऊन तो बॉसच्या घरी  गेला आणि दरवाज्यावर लाथा मारल्या. स्नॅपचॅटवर एक फोटो शेअर करत पीडित कुटूंबाला एक दरवाजा हवा असल्याचे सांगितले आहे. चोरी, गुंडगिरी असे आरोप बूरकेझवर लावण्यात आले आहेत. सुनावणीसाठी आरोपीला  २७ जानेवारीला कोर्टात हजर राहावं लागणार आहे. 

Web Title: Ex boss did not accept facebook friend request man threaten to kill him in north dakota america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.