After breakup Story: ब्रेकअपनंतर प्रियकराने टोस्टचे पैसेही वसूल केले, बिल पाहून गर्लफ्रेंड चक्रावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 01:37 PM2022-12-12T13:37:27+5:302022-12-12T13:38:55+5:30

...बाकी काहीही असो, त्या मुलाची स्मरणशक्ती चांगली असावी अथवा तो आधीपासूनच त्याच्या गर्ल फ्रेंडवर करत असल्याचा हिशेब ठेवत असावा, असे या प्रकरणावरून समजते.    

ex-boyfriend sent monthly expenditure to girlfriend after breakup and charge for toast and banana also | After breakup Story: ब्रेकअपनंतर प्रियकराने टोस्टचे पैसेही वसूल केले, बिल पाहून गर्लफ्रेंड चक्रावली!

After breakup Story: ब्रेकअपनंतर प्रियकराने टोस्टचे पैसेही वसूल केले, बिल पाहून गर्लफ्रेंड चक्रावली!

Next


जेव्हा लोक रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा ते आपल्या पार्टनरसाठी अनेक मोठ-मोठ्या गोष्टी करत असतात. पण ब्रेकअपनंतर त्यांना त्याच गोष्टींचा पश्चातापही होतो. काही से असेच प्रकरण येथे बघायला मिळाले आहे. खरे तर, एका मुलीने टिक टॉकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती सांगत आहे, की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला टोस्ट आणि केळीचाही हिशेब मागितला. एवढेच नाही, तर सर्व पैसे देण्यासाठी त्याने तिला एक एक्सेल स्प्रेडशीटही पाठवली आहे. यात सर्व प्रकारचा खर्च लिहिलेला आहे, असेही ती सांगते. बाकी काहीही असो, त्या मुलाची स्मरणशक्ती चांगली असावी अथवा तो आधीपासूनच त्याच्या गर्ल फ्रेंडवर करत असल्याचा हिशेब ठेवत असावा, असे या प्रकरणावरून समजते.    

टोस्टचे  पैसेही मागीतले -
टिकटॉकवर मॅडी नावाच्या एका मुलीने आपला हा एक्सपीरियन्स शेअर केला आहे. ती व्हिडिओमध्ये सांगत आहे, की तिच्या एक्‍स बॉयफ्रेंडने तिला एक महिन्यांपूर्वी खर्चांची लिस्ट पाठवली आहे. या लिस्टमध्ये 247 रुपयांच्या केळी पासून ते एक पीस टोस्ट चेही पैसे जोडले आहेत. याच बरोबर त्याने एक सॅड साँगदेखील टाकले आहे. याशिवाय या लिस्टमधील काही खर्च हायलाइटही केले आहेत. याच बरोबर सर्वात शेवटी सर्व खर्चांची उधारीही लिहिली आहे.

अशा आल्या लोकांच्या रिअ‍ॅक्शन्स -
मॅडीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर लोकांनीही जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे, जर दोन लोक एकत्र राहत असतील तर त्यांनी त्यांचा खर्च शेअर करायला हवा, पण या बिलात केळी आणि टोस्टचे बिलही सामील करण्यात आले आहे, हे थोडे विचित्र आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे, जसे काही आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहताय. यानंतर या मुलीने आणखी एक व्हिडिओही शेअर केला आहे. जो आतापर्यंत तब्बल 24 लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे.

तरुणीला ब्रेकअपचा नक्कीच पश्चाताप येत असेल -
एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, त्या मुलाचे डोके किती तेज असेल. आणखी एका यूजरने लिहिले आहे, की ब्रेकअप करून मुलिला नक्कीच पश्चाताप येत असेल. याशिवाय इतरही बऱ्याच लोकांनी यावर गमतीशीर कमेंट केल्या आहेत.
 

Web Title: ex-boyfriend sent monthly expenditure to girlfriend after breakup and charge for toast and banana also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.