गर्लफ्रेंडने तोडलं नातं, बॉयफ्रेंडने घेतला बदला; खर्चाची लिस्ट पाठवली, पैशाचा मागितला हिशोब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 17:57 IST2023-05-09T17:49:38+5:302023-05-09T17:57:53+5:30
ब्रेकअपनंतर एली नावाच्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने एक लांबलचक यादी पाठवली होती.

गर्लफ्रेंडने तोडलं नातं, बॉयफ्रेंडने घेतला बदला; खर्चाची लिस्ट पाठवली, पैशाचा मागितला हिशोब
जेव्हा दोन लोक नातेसंबंधात असतात आणि एकत्र आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहतात तेव्हा त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दल सर्व काही आवडतं. प्रियकर-प्रेयसी आपला वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करायला तयार असतात. मात्र, नातं तुटताच विषय संपता, अनेक गोष्टी पटकन बदलतात. असंच काहीसं एका तरुणीसोबत घडलं आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रेकअपनंतर एली नावाच्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने एक लांबलचक यादी पाठवली होती. ही यादी इतर कशाची नसून त्या खर्चाची होती जी त्याने नात्यादरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडवर आनंदाने खर्च केली होती. आता मुलगा यातील अर्ध्या पैशाची मागणी मुलीकडे करत आहे.
एली ही ऑस्ट्रेलियातील एडेलेडची रहिवासी आहे. ती तिचा पार्टनर एलेक्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकतेच त्यांचं नातं तुटलं. टिकटॉकवरील या घटनेचा संदर्भ देत 22 वर्षीय तरुणीने सांगितले की, तिच्या माजी प्रियकराने तिला आतापर्यंत झालेल्या खर्चाची यादी दिली आहे. ज्यामध्ये खाणंपिणं आणि सिनेमाच्या तिकिटांसह अनेक खर्चाचा समावेश आहे. आता ते दोघे एकत्र नसल्यामुळे यातील निम्मा खर्च प्रेयसीने द्यावा अशी त्याची इच्छा आहे.
मुलाला दर 15 दिवसांनी पैसे परत हवे आहेत, असेही मार्क केले आहे. एलीने सांगितले की, तिने अशा व्यक्तीला डेट केले आहे, ज्याने तिला त्याच्या कार्डला हातही लावू दिला नाही. खर्चाची शेअर्ड नोट ठेवण्याची कल्पना त्याची होती. आता तो त्याचा हिशोब मागत आहे. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.