२०० वर्षाआधी भारतात येऊन वसलं अफगाण राजघराणं, देहरादूनला दिलं बासमती तांदुळाचं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 02:08 PM2021-08-19T14:08:15+5:302021-08-19T14:10:23+5:30

अफगाणिस्तानमधील शेवटचं राजघराण इंग्रजांकडून भारता निर्वासित करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांचे वंशज देहरादूनमध्ये राहत आहेत.

Exiled 200 years ago Afghanistan royals introduced-basmati to Dehradun India living as farmers | २०० वर्षाआधी भारतात येऊन वसलं अफगाण राजघराणं, देहरादूनला दिलं बासमती तांदुळाचं गिफ्ट

२०० वर्षाआधी भारतात येऊन वसलं अफगाण राजघराणं, देहरादूनला दिलं बासमती तांदुळाचं गिफ्ट

Next

अफगाणिस्तानमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. तालिबानने इथे ताबा मिळवला आहे. लोक देश सोडून पळण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला अफगाणिस्तानातील शेवटच्या राजघराण्याबाबत सांगणार आहोत. हे राजघराणं २०० वर्षाआधी निर्वासित होऊन भारतात आलं होतं. या राजघराण्याने देहरादूनमध्ये बासमती तांदुळ आणला.

अफगाणिस्तानमधील शेवटचं राजघराण इंग्रजांकडून भारता निर्वासित करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांचे वंशज देहरादूनमध्ये राहत आहेत. या राजघराण्यातील ७ वंशज देहरादूनमध्ये शेतकरी म्हणून जीवन जगत आहेत. त्यांनी देहरादूनमध्ये बासमती तांदूळ आणला. जो खूप प्रसिद्ध आहे.

टाइम्‍स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना आहे १८४० मधील. काबुल ते मसूरी दरम्यानची ही गोष्ट आहे. तेव्हा पहिलं अॅंग्लो-अफगाण युद्ध सुरू होतं. त्यावेळी इंग्रजांना गजनीमध्ये विजय मिळाला होता. त्यादरम्यान बराकजई साम्राज्याचे संस्थापक आणि काबुल, पेशावर व काश्मीरचे शासक मोहम्मद खानने इंग्रजांसमोर समर्पण केलं होतं. त्यांना मसूरीला आणण्यात आलं होतं.

तेव्हा त्यांच्या नातवाचे पणतू मोहम्मद अली खान सांगतात की, यावेळी जे ठिकाणी वाइनबर्ग एलेन स्कूलच्या नावाने ओळखलं जातं. ते तिथेच राहत होते. त्या ठिकाणाला स्थानिक लोक बाला हिसार इस्टेट म्हणून ओळखलं जातं.

दोस्त मोहम्मद खान १८४२ मध्ये पुन्हा काबुलला  गेले. होते. याच्या चार दशकानंतर जेव्हा दुसरं अॅंग्लो-अफगाण युद्ध संपलं तेव्हा त्यांचा नातू याकून खान यानेही स्वत:ला त्यांच्यासारख्या स्थिती पाहिलं. त्यांनाही इंग्रजांनी काबुलमधून बाहेर काढलं. त्यानंतर तो १८७९ मध्ये देहरादूनला आला होता. मोहम्मद अली खाननुसार याकूब खानला शिकारीची आवड होती. आणि डोंगरावरही प्रेम होतं. इथे त्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या. 

देहरादूनचे इतिहासकार लोकेश ओहरी सांगतात की, दोस्त मोहम्मद खानला पुलाव फार आवडत होता. निर्वासनादरम्यान त्यांना पुलावची फार आठवण येत होती. त्यामुळे ते देहरादूनमध्ये बासमती घेऊन आले. इथे त्यावर प्रयोग केला. लोकेश यांच्यानुसार, त्यांचे नातू याकूब खानने ते पुढे वाढवलं. त्याने बासमती तांदुळाचं बी बाजारात व्यापाऱ्यांना दिलं आणि याची शेती करण्यास सांगितलं. त्यानंतर दूनी घाटातील वातावरण बासमती तांदुळासाठी फार चांगला ठरलं आणि तांदळाची अफगाणिस्तानपेक्षाही चांगली व्हेरायटी उत्पन्न होऊ लागली.
 

Web Title: Exiled 200 years ago Afghanistan royals introduced-basmati to Dehradun India living as farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.