लग्नासाठी मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या; नवरा गोरा नसला तरी चालेल, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 09:19 AM2022-03-09T09:19:43+5:302022-03-09T09:20:08+5:30

गाेऱ्या रंगाची सर्वांनाच भुरळ पडलेली दिसते; परंतु एखादी मुलगी गलेलठ्ठ नाेकरी करणारी असेल तर तिचा रंग पैशापुढे फिका पडताे.

Expectations of boys and girls for marriage increased | लग्नासाठी मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या; नवरा गोरा नसला तरी चालेल, पण...

लग्नासाठी मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या; नवरा गोरा नसला तरी चालेल, पण...

googlenewsNext

उष्ण कटिबंधातील व्यक्ती या बहुतांश सावळ्या किंवा काळ्या वर्ण असलेल्या असतात. त्यामुळेच प्रत्येकाला गाेऱ्या रंगाचे आकर्षण असते. प्रत्येक तरुणाला आपली बायकाे गाेरीच हवी, अशी अपेक्षा असते. भंडारा शहरातील बहुतांश तरुणांनाही लग्नासाठी मुलगी गाेरीच हवी असल्याचे दिसून येते.

लग्नासाठी मुलीच्या काय अपेक्षा?

मुलगा नाेकरीवर असावा. त्यातही ताे शासकीय नाेकरीवाला असावा, अशी बहुतांश मुलींची अपेक्षा आहे.

नवरा गाेरा नसला तरी सुस्वरूप असावा. त्याला काेणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.

लग्नासाठी मुलाच्या काय अपेक्षा?

पत्नी म्हणून घरी येणारी मुलगी कमावती असावा. सर्व घर सांभाळून घेणारी असावी.

माता-पित्यांची सेवा करणारी असावी. आहे त्या परिस्थितीत संसार चालविणारी असावी.

रंग आणि नोकरी महत्त्वाचे

गाेऱ्या रंगाची सर्वांनाच भुरळ पडलेली दिसते; परंतु एखादी मुलगी गलेलठ्ठ नाेकरी करणारी असेल तर तिचा रंग पैशापुढे फिका पडताे. मुलींना मात्र आपला जाेडीदार शासकीय नाेकरी करणाराच हवा असताे.

तरुण म्हणतात...

महागाईच्या काळात एकट्याच्या पगारात घर सांभाळणे कठीण जाते. त्यासाठी पत्नीही नाेकरी करणारी असावी. नाेकरी करीत नसेल तर फावल्या वेळात एखादा उद्याेग करून घरखर्चाला हातभार लावणारी असावी. - भास्कर कुंभारे, भंडारा

काळ्या रंगाला आपण बदनाम करून ठेवल. दुसरीकडे गाेऱ्या रंगालाच प्रतिष्ठा आहे. रंगापेक्षा स्वभावाला महत्त्व गरजेचे आहे. कारण आयुष्यभर दाेघांना एकत्र राहायचे असते. समजूतदारपणा महत्त्वाचा असताे. - अतुल लिमजे,

वधू-वर सूचक मंडळ काय म्हणतात...

आमच्या वधू-वर सूचक मंडळात नाव नाेंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक तरुणाला गाैरवर्णीय तरुणीच हवी असते. काही जण तडजाेड करून निमगाेरी चालेल असे म्हणतात; पंरतु शिकलेली आणि सुसंस्कृत मुलगी हवी असते. मुलींचे पालक जेव्हा नाेंदणी करण्यासाठी येतात. तेव्हा बहुतांश पालकांना आपला जावई शासकीय नाेकरीवालाच हवा असताे. त्यातही पुण्या-मुंबईत नाेकरी करणारा मुलगा हवा असताे. स्वत:चे घराची अपेक्षा असते.

Web Title: Expectations of boys and girls for marriage increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न