Eye for an Eye : मुलीनेच स्वत:च्या आईला फासावर लटकवले, पतीच्या हत्येचा महिलेवर होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 02:42 PM2021-03-24T14:42:58+5:302021-03-24T14:46:08+5:30

मरयम करीमी नावाच्या महिलेला तिच्याच मुलीने सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवले. फासावर लटकवण्याआधी मरयम अनेक वर्ष  तुरूंगात कैद होती.

Eye for an Eye: mother executed by her daughter for killing her father in Iran | Eye for an Eye : मुलीनेच स्वत:च्या आईला फासावर लटकवले, पतीच्या हत्येचा महिलेवर होता आरोप

Eye for an Eye : मुलीनेच स्वत:च्या आईला फासावर लटकवले, पतीच्या हत्येचा महिलेवर होता आरोप

Next

Eye for an Eye: इराणमध्ये(Iran) एका मुलीनेच आपल्या आईला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'डोळ्यांच्या बदल्यात डोळे' या कायद्यानुसार महिलेला शिक्षा सुनावण्यात आली होती. महिलेवर आरोप होता की, तिने तिच्या पतीची हत्या केली. इराणमध्ये न्यायाच्या नावावर दोषीला त्याच्या गुन्ह्याच्या बरोबरीत शिक्षा देण्याचा नियम आहे. या कायद्यानुसार, मरयम करीमी नावाच्या महिलेला तिच्याच मुलीने सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवले. फासावर लटकवण्याआधी मरयम अनेक वर्ष  तुरूंगात कैद होती.

मुलीनेच व्यक्त केली होती इच्छा 

Mirror UK च्या रिपोर्टनुसा, मरयम करीमीवर आरोप होता की, तिने तिच्या पतीची हत्या केली. मरयमचा पती तिच्यावर अत्याचार करत होता आणि घटस्फोट देण्यासही तयार नव्हता. मरयमच्या मुलीने वडिलांच्या हत्येसाठी आईला माफ करण्यास नकार दिला होता. इतकेच नाही तर तिने मृत्यू बदल्यात दिली जाणारी रक्कमही नाकारली होती. आणि आईला स्वत: फासावर लटकवेल अशी इच्छा व्यक्त केली होती. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डला भेटायला गेलेल्या तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, लघवी पिण्यासही भाग पाडलं!)

मीडिया रिपोर्टनुसार, मरयम करीमीने आपले वडील अब्राहिमसोबत मिळून ही हत्या केली होती. आतापर्यंत हे स्पष्ट नाही की, अब्राहिमला फाशी दिली गेली की नाही. मात्र, तो आपल्या मुलीला फाशी देताना साक्षीदार म्हणून तुरूंगात उपस्थित होता. मरयमवर हत्येची केस चालवली गेली आणि तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.  

कियास कायद्यानुसार, पीडितच्या परिवाराला दोषीला शिक्षा देतेवेळी उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. अनेक केसेसमध्ये तर त्यांनाच शिक्षा देण्याची संधी दिली जाते. जशी मरयमच्या मुलीला मिळाली. या कायद्यानुसार, कमी वयाच्या गुन्हेगारांनाही मृत्यदंड देण्याचा नियम आहे. (हे पण वाचा : तिच्यासाठी 'त्याने' चक्क कापल्या हाताच्या नसा! तरुणाची विवाहित महिलेवर जबरदस्ती)

मरयम करीमीच्या केसमध्ये पुन्हा एकदा इराणच्या कट्टर कायद्यांबाबत वाद सुरू झाला आहे. मानवाधिकार संघटनांनी यावर टीका केली. संघटना म्हणाल्या की, हा न्याय नाही तर क्रूरता आहे. मरयमच्या मुलीला अनेक वर्ष हेच शिकवलं गेलं की, तिच्या आईने गुन्हा केलाय. त्यामुळेच ती तिच्या आईला माफ करू शकली नाही.
 

Web Title: Eye for an Eye: mother executed by her daughter for killing her father in Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.