मनुष्यांचे डोळे किती मेगापिक्सलचे असतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:57 PM2024-09-14T14:57:18+5:302024-09-14T15:15:32+5:30
अनेकांना हे माहीत नसतं की, मनुष्यांच्या डोळ्यांचा मेगापिक्सल फोनच्या कॅमेरापेक्षा खूप जास्त असतो.
Eye Lens Megapixel: बाजारात रोज नवनवे स्मार्टफोन लॉन्च होत असतात. फोन खरेदी करताना सगळेच लोक यातील फीचर व्यवस्थित बघतात. त्यात सगळ्यात जास्त काही बघत असतील तर फोनचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे. लोक जास्तीत जास्त मेगापिक्सलचा फोन घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मनुष्यांच्या डोळ्यांचा मेगापिक्सल फोनच्या कॅमेरापेक्षा खूप जास्त असतो.
जास्त मेगापिक्सलच्या कॅमेराने फोटोंची क्वालिटी चांगली मिळते. मात्र, आपल्या डोळ्यांच्या मेगापिक्सलसमोर स्मार्टफोनचे कॅमेरे टिकू शकत नाहीत.
आपल्या डोळ्यांमध्ये नॅचरल लेन्स असते, जे एखाद्या कॅमेरासारखी काम करते. ही लेन्स काचेची नाही तर नॅचरल असते. जर आपले डोळे एक डिजिटल कॅमेरा गृहीत धरले तर ते ५७६ मेगापिक्सलपर्यंतचं दृश्य बघण्यासाठी सक्षम असतात. म्हणजे आपल्या डोळ्यांची लेन्स ५७६ मेगापिक्सलच्या बरोबरीत असते.
क्वचितच काही लोकांना माहीत असेल की, आपले डोळे एखाद्याय कॅमेरासारखे काम करतात आणि यात मुख्यपणे तीन भाग असतात. पहिला असतो लेन्स, जी प्रकाशाला एकत्र करून इमेज बनवते.
दुसरा असतो सेंसर जो दृश्याच्या प्रकाशाला इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतरित करतो. तिसरा असतो प्रोसेसर जो हे इलेक्ट्रिक सिग्नल्स इमेजमध्ये रूपांतरित करून स्क्रीनवर दाखवतं.
आपले डोळे ५७६ मेगापिक्सलपर्यंतचं दृश्य बघू शकतात. पण आपला मेंदू हा सगळा डेटा एकत्र प्रोसेस करू शकत नाही. त्यामुळे कोणतंही दृश्य बघण्यासाठी आपल्याला डोळे त्या त्या दिशेला फिरवावे लागतात.
आता असा प्रश्न पडतो की, वाढत्या वयात डोळ्यांची क्षमता आणि मेगापिक्सलवर प्रभाव पडतो का? तर याचं उत्तर होय असं आहे. जसजसं आपलं वय वाढतं आपल्या शरीरातील इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचा रेटिनाही कमजोर होऊ लागतो. याचा थेट प्रभाव आपल्या बघण्याच्या क्षमतेवर पडतो आणि डोळ्यांच्या मेगापिक्सल क्षमतेमध्येही बदल होतो.