खरं की काय! बडवायझरचा कर्मचारी १२ वर्षे बिअर टँकमध्ये मुत्रविसर्जन करायचा? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 06:33 PM2020-07-02T18:33:06+5:302020-07-02T18:38:10+5:30
Fact cheack : बडवायझरच्या कर्मचाऱ्याने आपण १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, असं मान्य केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर बडवायझरचा कर्मचाऱ्याची बातमी वेगाने पसरत आहे. हा प्रकार तुम्हाला खुपच किळसवाणा वाटू शकतो. बडवायझरचा कर्मचारी बिअरच्या टँकमध्ये लघवी करत असल्याची बाब सर्वत्र व्हायरल होत आहे. एखादी व्यक्ती दारूच्या बाटलीत लघवी करते, याबाबत कल्पनाही नसणारी दुसरी व्यक्ती ती दारू पिते, असा सीन तुम्ही सिनेमात अनेकदा पाहिला असेल. पण सिनेमात नाही तर खऱ्याखुऱ्या आयुष्यात सुद्धा अशा घटना घडतात.
आता हा प्रकार वाचून बडवायझर बिअर पित असेलल्या लोकांना धक्काच बसला असेल. या ब्रॅण्डचा कर्मचारी जवळपास १२ वर्ष दारूच्या कॅनमध्ये लघवी करत होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बडवायझरच्या कर्मचाऱ्याने आपण १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, असं मान्य केलं आहे.
वॉल्टर पॉवेल असं या कर्मचाऱ्याचं नाव असल्याचाही या बातमीत उल्लेख करण्यात आला होता. ही बातमी वाचल्यानंतर जे लोक ही बिअर पित होते, त्यांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे. अनेक लोक तर आपण कितीवेळा ही बिअर प्यायलो याबाबत विचार करत असतील. तर अनेक ठिकाणी मित्रांमध्ये हा थट्टेचा विषय ठरला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. परंतू इतक्या प्रतिष्ठीत आणि मोठ्या ब्रॅण्डच्या बाबतीत अस होऊ शकतं का? याबाबत मात्र शंकाच आहे.
#Budweiser Employees Admits Mixing Pee in the beer.
— Shubham Bhatt (@Shubharcasm) July 2, 2020
Non Drinkers to Drinkers : pic.twitter.com/r6LeuG5X8e
People: Toh aap log beer kaha bnate hai? #Budweiser Ceo: pic.twitter.com/5sINwRqiue
— Sir-Kid (@ooobhaishab) July 2, 2020
Baniya after knowing he has been wasting his pee all his life whereas he could have sold it to #Budweiserpic.twitter.com/vmJajB0xMP
— Peejjah🐽 (@Falana_Dimka) July 2, 2020
आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस
मालकिणीचा विरह सहन न झाल्याने; इमानी कुत्रीने ४ थ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन!