हे वर्ल्ड रेकॉर्ड्स होता होता राहिले, कारण वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:40 PM2018-08-31T14:40:18+5:302018-08-31T14:42:42+5:30
हे रेकॉर्ड्स नावावर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण अनेकदा असं होतं की, सर्व तयारी केल्यावरही लोक रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यापासून थोडक्यात चुकतात.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची सुरुवात १९९५ मध्ये झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत कितीतरी रेकॉर्ड नोंदवले गेले आणि कितीतरी तोडले गेले. हे रेकॉर्ड्स करणं सोपं नसतं. हे रेकॉर्ड्स नावावर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण अनेकदा असं होतं की, सर्व तयारी केल्यावरही लोक रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यापासून थोडक्यात चुकतात. चला जाणून घेऊ असेच काही वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे प्रयत्न जे होता होता राहिले.
जगातला सर्वात लांब सॅंडविच
(Image Credit : www.mirror.co.uk)
जगातला सर्वात लांब सॅंडविच १३७८ मीटर लांब होता, हा इटलीतील एका ग्रुपने हा सॅंडविच तयार केला होता. हा रेकॉर्ड तोडण्यासाठी इटालियन महिलांनी पूर्ण तयारी केली होती. याचा खूप प्रचारही केला होता. लोकांची गर्दीही झाली होती. १५०० मीटर लांब सॅंडविच तयार करण्यात खूप वेळ लागला आणि भूकेने वैतागलेल्या लोकांनी हा सॅंडविच एका बाजूने खायला सुरुवात केली आणि हा रेकॉर्ड होता होता राहिला.
डॉमिनो टॉपलिंग
(Image Credit : www.therichest.com)
नेदरलॅंडचा एक ग्रुप ४ मिलियन टाइल्स एकत्र उभ्या करण्याचा रेकॉर्ड करणार होता. यासाठी त्यांनी सर्व तयारीही केली होती. पण रेकॉर्ड नोंदवण्याच्या एक दिवसआधी एका पक्षाने त्यांची सगळी मेहनत धुळीस मिळवली. तो पक्षी उडत आला आणि २३००० टाइल्स पाडून गेला. त्यामुळे हा रेकॉर्ड रद्द करण्यात आला.
Smurfs बनवण्याचा रेकॉर्ड
(Image Credit : www.mirror.co.uk)
या रेकॉर्डमध्ये लोकप्रिय सिनेमा Smurfs च्या कॅरेक्टर्सचा लूक दिला जाणार होता. यासाठी क्रोएशियातील ३९५ लोक Smurfs सारखे निळ्या रंगात रंगलेही होते. पण जेव्हा त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा रेकॉर्ड नोंदवण्यासाठी संपर्क केला तेव्हा त्यांना कळाले की, त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. कारण Warwick University च्या ४५१ विद्यार्थ्यांनी हा रेकॉर्ड आधीच केला आहे.
सर्वात जास्त काळ उपवास ठेवणे
(Image Credit : www.therichest.com)
रशियातील Agasi Vartanyan नावाच्या एका व्यक्तीने २००६ मध्ये सर्वात जास्त दिवस काहीच न खाता राहण्याचा रेकॉर्ड करण्याची सुरुवात केली होती. ५० दिवसांपर्यंत त्याची चर्चा मीडियात रंगली होती, तेव्हा त्याला कळाले की, याबाबत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबाबत सांगण्यातच आले नाही. ते याआधीचा रेकॉर्ड चेक करणे विसरले जो ९४ दिवसांचा होता.
न झोपता राहणे
(Image Credit : www.therichest.com)
Tony Wright नावाच्या व्यक्तीने २००७ मध्ये न झोपता सर्वात जास्त वळ राहण्याचा रेकॉर्ड करण्याचे ठरवले होते. तो २६६ तास म्हणजेच ११ दिवसांपर्यंत असे करण्यात यशस्वी ठरला होता.पण जेव्हा रेकॉर्ड नोंदवण्याची वेळ आली तेव्हा त्यांला कळाले की, कुणीतरी याआधी ११ दिवस १० तासांचा रेकॉर्ड केला आहे.
ब्रा ने तयार केलेली लांब चेन
(Image Credit : www.cracked.com)
याचा पहिला रेकॉर्ड १६६, ६२५ ब्रा इतका होता. पण २०११ मध्ये इग्लंडमधील काही लोकांनी हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते यातच अडकून राहिले. यात सहभागी लोकांनी ब्रा अशाप्रकारे जोडले की, ते त्यात अडकले गेले आणि ते हे ठिक करु शकले नाहीत.
नारळ तोडण्याचा रेकॉर्ड
या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा उद्देश एका मिनिटात हाताने सर्वात जास्त नारळ तोडणे हा होता. त्याने हा रेकॉर्ड तर तोडला नाही पण त्याचा हात मात्र मोडला.
आगीवर चालणे
आगीवर चालण्यासारखा घातक रेकॉर्ड सुद्धा लोकांना करायचा असतो. पण हा रेकॉर्ड करण्याच्या नादात अनेकांचे पाय भाजले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे ते हा रेकॉर्ड नोंदवू शकले नाही.