वाह काय नोकरी आहे! इथे ऑफिसमध्ये दिली जाते खुलेआम झोपण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:30 PM2018-09-14T12:30:02+5:302018-09-14T12:30:52+5:30
तुम्हीही त्या लोकांपैकी एक आहात का? जे ऑफिसमध्येही झोपायला मिळायला हवं असा विचार करतात. जर उत्तर हो असेल तर तुम्ही जपानला जाण्याचा विचार करु शकता.
तुम्हीही त्या लोकांपैकी एक आहात का? जे ऑफिसमध्येही झोपायला मिळायला हवं असा विचार करतात. जर उत्तर हो असेल तर तुम्ही जपानला जाण्याचा विचार करु शकता. कारण इथे काम करताना झोप घेणे पूर्णपणे मान्य आहे. इतकेच नाही तर ऑफिसमध्ये असताना झोपण्यासाठी जपानमध्ये एक टर्म सुद्धा आहे. इनेमुरी म्हणजेच उपस्थित पण झोपलेला.
ऑफिसमध्ये असताना झोपण्याची परवानगी का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्याचं उत्तर असं आहे की, जपानमध्ये लोकांचे काम करण्याचे तास अधिक असतात आणि त्या कारणाने कर्मचारी केवळ ६ तास किंवा त्यापेक्षा कमीच झोप घेऊ शकतात.
जपानमधील लोकांची जगभरात मेहनती लोक म्हणून ओळख आहे. त्यामुळे इथे जेव्हाही कुणी झोप घेताना दिसत असेल तर तो खूप काम करुन थकलाय, असं समजलं जातं. ऑफिसमध्ये झोपण्याचं हे चलन तेव्हा सुरु झालं जेव्हा युद्धानंतर जपानचे लोक देशाला पुढे नेण्यासाठी मेहनत करत होते.
असे असले तरी ऑफिसमध्ये झोप घेण्याबाबत काही नियम आहेत. तुम्ही कधीही झोप घेऊ शकत नाहीत. कॅम्ब्रिज यूनिव्हर्सिटीतील डॉ. ब्रिगेट स्टीगेर यांनी जपानी संस्कृतीवर बराच अभ्यास केलाय. त्यांनी एका चॅनलसोबत बोलताना सांगितले की, जर तुम्ही कंपनीमध्ये नवीन आहात तर तुम्हाला हे दाखवावं लागेल की, तुम्ही किती मेहनती आणि उत्साही आहात. तुम्ही झोपू शकत नाहीत.
पण जर तुम्ही ४० किंवा ५० वयाचे असाल आणि मिटींगमध्ये तुमच्या कामाशी संबंधित काही विषयावर चर्चा होत नसेल तर तुम्ही एक झोप काढू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये जितक्या मोठ्या पदावर असाल तुम्ही अधिक झोपू शकता. भलेही अशाप्रकारे ऑफिसमध्ये झोपण्याची परवानगी देण्यात आली असली तर याचे काही नियम आहेत.
डॉ.स्टीगर यांनी सांगितले की, तुम्हाला मिटींग दरम्यान अॅक्टींग करावी लागेल की, तुम्ही अॅक्टीव आहात आणि तुमचं लक्ष आहे. तुम्ही टेबलच्या खाली लपून झोपू शकत नाहीत. पण लवकरच हे चलन बंद होण्याची शक्यता आहे. याचं कारण आता नवीन व्यवस्था आणली जात आहे. त्या माध्यमातून जपानमध्ये कामावर असताना झोप घेणाऱ्यांची ओळख पटवू शकेल. जर डेस्कवर कुणी झोपताना पकडला गेला तर कम्प्युटर ऑटोमॅटीकली रुमचं टेम्प्रेचर कमी करेल. जेणेकरुन झोपलेला उठेल.