३.२ लाख रूपयात केलं होतं लक्झरी हॉलिडेचं बुकींग, डेस्टिनेशनला पोहोचल्यावर हॉटेल गायब...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:42 PM2019-11-19T12:42:42+5:302019-11-19T12:45:24+5:30
एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जायचं म्हटलं की, किती प्लॅनिंग करावं लागतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आधी कुठे जायचं? किती खर्च येणार? हॉटेलचं बुकिंग असं काय काय प्लॅन करावं लागतं.
एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जायचं म्हटलं की, किती प्लॅनिंग करावं लागतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आधी कुठे जायचं? किती खर्च येणार? हॉटेलचं बुकिंग असं काय काय प्लॅन करावं लागतं. पण एवढं सगळं प्लॅनिंग केल्यावर आणि ऑनलाइन माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवल्यावर काय होऊ शकतं, याचं एक उत्तम उदाहरण असलेली घटना समोर आली आहे. एका ५ सदस्य असलेल्या परिवाराने एक लक्झरी हॉलिडे प्लॅन केला होता. यासाठी त्यांनी ३.२ लाख रूपयांमध्ये सगळी बुकिंग केली होती. पण जेव्हा ते तिथे गेले तेव्हा त्यांना असा काही अनुभव आला की, त्यांना कपाळावर हात मारायची वेळ आली.
डेली मेलच्या एका वृत्तानुसार, ब्रिटनच्या या परिवाराने इजिप्तला फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. लव्ह हॉलिडेज नावाच्या ट्रॅव्हल कंपनीने २ आठवड्यांसाठी सगळं बुकिंग करून दिलं. ऑनलाइन पेमेंटही झालं. पण जेव्हा हे लोक इजिप्तला पोहोचले तर तिथे हॉटेलच नव्हतं. इतकेच काय तर यांना दुसऱ्या अशा हॉटेल्समधे नेण्यात आलं, जे आधीच तोडले जात होते. आता काहीच पर्याय नसल्याने या परिवाराला याच हॉटेलमधे थांबावं लागलं.
'द सन' सोबत बोलताना या परिवारातील लोकांनी सांगितले की, 'हॉटेलचं फर्निचर तुटलेलं होतं. फ्लोर फार घाणेरडं झालं होतं. भिंती आणि सिलिंगही तुटलेलं होतं. आम्हाला जेव्हा रूम देण्यात आली, तेव्हा आम्हाला धक्काच बसला'.
याच परिवारातील मार्कने सांगितले की, 'आम्हा सर्वांसाठीच हा सगळा प्रकार फार भयावह होता. आम्हाला रडायला येऊ लागलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की, आम्ही आता आजारी पडणार आहोत. इतके पैसे खर्च आम्ही खर्च केले होते. पण आमच्या स्वप्नाला ग्रहण लागलं होतं'.
पुन्हा ७.४ लाखांचा खर्च
असे सांगितले जात आहे की, बुकिंग एजन्सीकडे सतत तक्रार केल्यानंतर त्यांनी या परिवाराला एका तिसऱ्याच हॉटेलमधे शिफ्ट केलं. तिथे त्यांना ७.४ लाख रूपये वेगळे द्यावे लागले. हे पैसे होल्डिंग डिपॉझिट म्हणून घेण्यात आले होते. नंतर ट्रॅव्हल कंपनीने यातील ४.५ लाख रूपये परिवाराला परत दिले.