एक असा अनोखा परिवार ज्यातील लोक प्राण्यांसारखे चार पायांवर चालतात, पण असं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 02:24 PM2023-09-02T14:24:03+5:302023-09-02T14:25:54+5:30
या परिवारातील पाच भाऊ-बहिणींबाबत 2000 सालात एक सायंटिफिक पेपर पब्लिश झाला होता. ज्यात त्यांच्या चालण्याबाबत सविस्तर सांगितलं आहे.
जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे परिवार असतात, ज्यातील काही फारच अजब असतात. म्हणजे त्यांच्या वागण्यामुळे ते चर्चेत असतात. अशाच एका परिवाराची सध्या चर्चा सुरू आहे. या परिवारातील लोक मनुष्यासारखे दोन पायांवर नाही तर प्राण्यांसारखे चार पायांवर चालतात. हे लोक दोन्ही हातांचा वापर पायांसारखा करतात. हा परिवार तुर्कीतील एका गावात राहतो. या परिवारातील पाच भाऊ-बहिणींबाबत 2000 सालात एक सायंटिफिक पेपर पब्लिश झाला होता. ज्यात त्यांच्या चालण्याबाबत सविस्तर सांगितलं आहे.
हा पेपर पब्लिश झाल्याच्या काही वर्षानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील सायकॉलॉजिस्ट प्रोफेसर निकोलस हम्फ्रे हे या परिवाराला भेटण्यासाठी तुर्कीला गेले होते. उलास परिवारात एका दाम्पत्याला 18 मुले होती. ज्यातील केवळ सहाच असे होते. जे प्राण्यांसारखे चालत होते. असं याआधी कधी बघण्यात आलं नव्हतं. या परिवाराबाबत एक माहितीपटही आला. यात हम्फ्रे यांनी सांगितलं की, त्यांनी विचारही केला नव्हता की, आधुनिक अवस्थेत कुणी मनुष्य पशु अवस्थेत जाऊ शकतो.
ते म्हणाले होते की, ज्या गोष्टीमुळे मनुष्य प्राण्यापेक्षा वेगळे ठरतात ती गोष्ट म्हणजे दोन पायांवर चालणं. त्याशिवाय भाषा आणि इतरही अनेक गोष्टी आहेत. पण या परिवारातील सहा लोकांनी तर सीमाच पार केली.
माहितीपटात उसाल परिवाराला मनुष्य आणि माकडांमधील धागा सांगण्यात आलं. ज्यांचं अस्तित्वच नसावं. यांच्या चालण्याच्या पद्धतीबाबत आजपर्यंत कुणी काही शोध लावू शकलं नाही.
काही एक्सपर्ट सांगतात की, असं काही आनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतं. या सहा भाऊ-बहिणींपैकी आता केवळ पाच जिवंत आहेत. ज्यांची वयं 22 ते 38 दरम्यान आहेत. सगळेच ब्रेन डॅमेजच्या विशेष रूपाने पीडित आहेत. डॉक्टरांनी एमआरआय स्कॅनही दाखवला, ज्यातून समजतं की, त्यांच्या प्रत्येकाच्या मेंदुचा एक भाग आकुंचन पावला आहे. ज्याला सेरेबेलर वर्मिस म्हटलं जातं.
पण याचा अर्थ हा होत नाही की, त्यांनी प्राण्यांसारखं चार पायांवर चालावं. कारण ही समस्या असणारे इतर लोक सगळ्यांसारखे दोन पायांवरच चालतात. या परिरातील लोक दोन हातांचा पायांसारखाच वापर करतात.