...म्हणून तरूणी आणि महिलांसाठी तयार केले 'बॉयफ्रेन्ड', कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:01 PM2019-08-06T12:01:58+5:302019-08-06T12:08:22+5:30
आता केवळ तरूणी आणि महिलांसाठी हा बॉयफ्रेन्ड हग स्पीकर्स तयार करण्यात आला असला तरी पुढील काळात मुलांसाठीही अशा गर्लफ्रेन्ड तयार केल्या जातील.
जपानची व्हिडीओ गेम कंपनी लेव्हल-५ ने ओतोमे युशासोबत मिळून एक डमी बॉयफ्रेन्ड तयार केला आहे. तरूणी आणि महिला या बॉयफ्रेन्डला आलिंगण देऊन आपला तणाव दूर करू शकतात. महत्वाची बाब म्हणजे महिला हा बॉयफ्रेन्ड त्यांच्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकतील. जसे की, रेस्टॉरंट, थिएटर, शॉपिंग सेंटर. या प्रॉडक्टचं नाव 'बॉयफ्रेन्ड हग स्पीकर्स' असं ठेवण्यात आलं आहे.
(Image Credit : Metro)
या प्रॉडक्टला दोन हातांशिवाय पांढऱ्या रंगाची उशीही लावण्यात आली आहे. ज्यावर कंपनीचा नवीन गेम हिरो ऑफ मेडन्सच्या मुख्य कॅरेक्टरचं स्केचही काढण्यात आलं आहे. जास्त कंफर्टेबल वाटावं म्हणून या डमी बॉयफ्रेन्डच्या हातांमध्ये ब्लुटूथ स्पीकर्स लावण्यात आले आहेत. या डमी बॉयफ्रेन्डला आलिंगण देताच यातून म्युझिक वाजू लागेल.
एकच बॉयफ्रेन्ड, कुणाला मिळणार?
(Image Credit : Metro)
हा बॉयफ्रेन्ड स्पीकर मिळवणं इतकंही सोपं नाही. कारण ओतोमे युशा कंपनीने याचा केवळ एकच सेट तयार केला आहे. तसेच हा सेट विक्रीसाठी नाहीये. एखादी लकी विनरच याला मिळवू शकेल. कंपनीने यासाठी ट्विटरवर स्पर्धा सुरू केली असून विजेत्याच्या नावाची घोषणा ९ ऑगस्ट रोजी केली जाईल. त्यांनाच हा डमी बॉयफ्रेन्ड दिला जाईल.
मुलांसाठीही तयार केला जाणार असे स्पीकर्स
(Image Credit : Toxel.com)
कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बॉयफ्रेन्ड हग स्पीकर्स कमाल आहे. पण अनेक लोकांचं असं मत आहे की, यांचा वापर केवळ तरूणी किंवा महिलाच करू शकतील. मुलींच्या आवाजातही असे स्पीकर्स असायला हवे, कारण तरूणांनाही एकटेपणा जाणवतो. त्यांनाही एकटेपणा घालवण्यासाठी कुणाची गरज असते. त्यामुळे मुलांसाठीही असे स्पीकर्स तयार केले जातील.