उलट्या दिशेला धावण्याची हौस; ‘रेट्रो रनिंग’ला चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 05:24 AM2019-06-30T05:24:27+5:302019-06-30T05:24:40+5:30

एक प्रयोग म्हणून २०१३ मध्ये शांटेलीने उलट्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर तिला ते फारच आवडू लागले. ती नियमितपणे उलट पावली धावण्याचा सराव ती करते.

The fancy to run on the opposite side; Running 'Retro Running' | उलट्या दिशेला धावण्याची हौस; ‘रेट्रो रनिंग’ला चालना

उलट्या दिशेला धावण्याची हौस; ‘रेट्रो रनिंग’ला चालना

Next

धावण्यामुळे घोटा मुरगळेल, पाय घसरेल अशी भीती आपणाला असते, पण धावत पुढे जाण्यापेक्षा उलट पावली धावत जाणेच इंग्लंडमधील एका महिलेला खूप आवडते. शांटेली गॅस्टन-हिर्ड (३२) असे तिचे नाव. रेट्रो रनिंगची आवड असलेली ही महिला टेÑडमीलवरही उलट दिशेनेच धावते. पुढे धावण्यापेक्षा मागे धावत जाण्यात खूप गंमत आहे, असे तिचे म्हणणे.
तिने २०१७ मध्ये उलट्या दिशेने धावून हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. तिने १३ मैलांचे अंतर २ तास ३१ मिनिटांत पार करून गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदविला. ती धावायला जाते, तेव्हा ‘तू चुकीच्या पद्धतीने धावते आहेस’ अशा कॉमेंट्स केल्या जातात. सुरुवातीला उलट्या दिशेने धावणे ही गंमत वाटायची. अशा धावण्याचा अभ्यास केला, तेव्हा यामुळे मांसपेशींना खूप फायदा होत असल्याचे दिसून आले, असे तिचे म्हणणे आहे.
एक प्रयोग म्हणून २०१३ मध्ये शांटेलीने उलट्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर तिला ते फारच आवडू लागले. ती नियमितपणे उलट पावली धावण्याचा सराव ती करते. शांटेली गेली सहा वर्षे उलट्या दिशेने धावत आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला. या व्यायामाचा आनंद मिळावा, यासाठी होतकरू धावपटूंसाठी आठवड्यातून एकदा ती सरावही घेते. ‘रेट्रो रनिंग’मुळे तुमचा आत्मविश्वास आश्चर्यकारकपणे वाढतो. मी वेगवान धावपटू आणि मध्यम अंतराची ‘ट्रिअ‍ॅथलिट’ कसरतपटू आहे. इतरांनीही सुरक्षित वातावरणात ‘रेट्रो रनिंग’चा अनुभव घ्यावा, यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मी एक मैलाची स्पर्धा आयोजित करते, असे तिचे म्हणणे.

Web Title: The fancy to run on the opposite side; Running 'Retro Running'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.