...म्हणून ट्रेनमध्ये असणारे पंखे चोरी होत नाहीत! रेल्वेने लढवली शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:25 PM2022-11-09T12:25:11+5:302022-11-09T12:26:17+5:30
ट्रेनमधील चोरीचे प्रमाण वाढतच चालले होते. यामुळे रेल्वे चे नुकसान होऊ लागले. मग रेल्वे ने हे प्रकार थांबवण्यासाठी युक्ती केली.
भारतात रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रेन ही एकप्रकारे लोकांसाठी लाईफलाईनच आहे. ट्रेनमधील चोरीच्या घटना तर आपण बऱ्याचदा ऐकतो. पुर्वी तर ट्रेन मधून पंखे, बल्ब सुद्धा चोरीला गेले आहेत. पण तुम्हाला माहितीये का आता चोर ट्रेनमधील पंखे चोरी करु शकत नाही. जरी चोरी केलेच तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही.
हे पंखे फक्त ट्रेन मध्येच चालतात
ट्रेनमधील चोरीचे प्रमाण वाढतच चालले होते. यामुळे रेल्वे चे नुकसान होऊ लागले. मग रेल्वे ने हे प्रकार थांबवण्यासाठी युक्ती केली. ट्रेन मध्ये असे पंखे बसवण्यात येऊ लागले जे पंखे घरी चालूच शकणार नाहीत. ट्रेनमधून जर हे पंखे काढले तर त्याचा उपयोगच होणार नाही आणि ते अक्षरश: भंगारात टाकावे लागतील.
काय आहे ही युक्ती ?
आपण शिकलोच आहोत विजेचे दोन प्रकार असतात. एक अल्टरनेटिव्ह करंट आणि दुसरा डायरेक्ट करंट. जर घरात अल्टरनेटिव्ह करंटचा वापर होत असेल तर जास्तीत जास्त २२० वोल्ट पॉवर चा वापर होतो. तेच जर डायरेक्ट करंट चा वापर होत असेल तर ५, १२ किंवा २४ वोल्ट पॉवर असते. मात्र ट्रेनमध्ये लागणारे पंखे हे ११० वोल्ट पॉवर वर काम करतात. जे फक्त डायरेक्ट करंटवर काम करतात. यामुळेच हे पंखे कोणी चोरी केले तरी त्याचा काहीच उपयोग होऊ शकणार नाही.
घरांमध्ये वापरली जाणारी डायरेक्ट करंट वीज ही ५, १२ किंवा २४ वोल्ट पेक्षा जास्त नसते. यामुळे कोणाही हे पंखे घरात लावू शकणीर नाहीत. ट्रेन मध्ये लावले जाणारे पंखे हे फक्त ट्रेन मध्येच चालू शकतात.