बाबो! कपाळावर १७४ कोटी रूपयांचा हिरा लावून फिरत होता रॅपर, गर्दीत फॅनने लांबवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:00 PM2021-09-09T17:00:42+5:302021-09-09T17:04:18+5:30

रॅपरने हा हिरा त्याच्या कपाळाच्या मधोमध ऑपरेशन करून चिकटवला होता. पण आता या हिऱ्याबाब रॅपरने धक्कादायक खुलासा केलाय.

Fans ripped out rapper lil uzi vert rs 174 crore forhead diamond | बाबो! कपाळावर १७४ कोटी रूपयांचा हिरा लावून फिरत होता रॅपर, गर्दीत फॅनने लांबवला

बाबो! कपाळावर १७४ कोटी रूपयांचा हिरा लावून फिरत होता रॅपर, गर्दीत फॅनने लांबवला

googlenewsNext

जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना विचित्र शौक आहेत. हे शौक पूर्ण करण्यासाठी लोक काहीपण करायला तयार होतात. असाच एक शौकीन रॅपर आहे लिल उजी वर्ट. तुम्हाला आठवत असेल तर याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने त्याच्या कपाळा बहुमूल्या गुलाबी हिरा लावून घेतला होता. रॅपरने हा हिरा त्याच्या कपाळाच्या मधोमध ऑपरेशन करून चिकटवला होता. पण आता या हिऱ्याबाब रॅपरने धक्कादायक खुलासा केलाय. ज्याबाबत वाचून लोक हैराण झालेत.

एका रिपोर्टनुसार, अमेरिकन रॅपर लिल उजी वर्टने दावा केला आहे की, जेव्हा तो नुकताच एका आउटलेटसोबत बोलत होता. तेव्हा त्याचा रोलिंग लाउडमध्ये एक शो होता आणि यादरम्यान तो फॅनमध्ये गेला. यावेळी फॅन्सची मोठी गर्दी जमली होती. पण तेव्हाच अचानक एका फॅनने रॅपरच्या कपाळावरील हिरा काढून घेतला. असं असलं तरी त्याने सांगितलं की, अजून बरेच हिरे त्याच्याकडे आहे. चोरी गेलेल्या हिऱ्याची किंमत २४ मिलियन डॉलर इतकी होती. भारतीय करन्सीनुसार ही किंमत साधारण १७४ कोटी रूपये इतकी होते.

रॅपर लिल उजी वर्टला त्यावेळी अजिबात जाणवलं नाही की, त्याचा हिरा कुणीतरी काढून घेतलाय. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं की, हिरा गायब आहे तेव्हा तो पुन्हा मागे वळून गेला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे त्याने बरेच दिवस याबाबत कुणाला काही सांगितलं नाही. कारण कुणाला यावर विश्वास बसला नसता. पण आता त्याने या घटनेबाबत खुलासा केला. लिल उजी वर्ट म्हणाला की, तो २०१७ पासून या हिऱ्याची किंमत चुकवत होता. जेणेकरून त्याला त्याचा शौक पूर्ण करता यावा.
 

Web Title: Fans ripped out rapper lil uzi vert rs 174 crore forhead diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.