गायिकेचे गाणे ऐकून चाहते झाले 'सैराट', स्टेजवर पाडला पैशांचा पाऊस; व्हिडिओ पाहून व्हाल चकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:06 PM2021-11-19T13:06:25+5:302021-11-19T13:07:17+5:30
गुजराती गायिका उर्वशी रादाडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांकडून तिच्यावर नोटांचा पाऊस पडताना दिसतोय.
नवी दिल्ली: चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारासाठी वेडे असतात. अनेकदा तुम्ही चाहत्यांनी आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीतरी मोठे काम केल्याचे पाहिले असेल. अशाच प्रकारची एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान गायकावर चाहत्यांनी अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील प्रसिद्ध गायिका उर्वशी रादाडिया यांच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. त्यांच्या गाण्यादरम्यान चाहत्यांकडून नोटांचा पाऊस पाडण्यात आला. उर्वशी स्टेजवर परफॉर्म करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, त्यांचा एक चाहता मागून येतो आणि बादली भरून त्याच्यावर नोटांचा पाऊस पाडू लागतो. याशिवाय स्टेजवर सर्वत्र नोटाच-नोटा दिसत आहेत. नोटांच्या पावसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उर्वशी रादाडियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. उर्वशीने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'श्री समस्त हिरावाडी ग्रुपने तुळशी विवाहाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये लोकदिरा आयोजित करण्यात आला होता. तुमच्या अमुल्य प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार'. उर्वशीचा हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि व्हिडिओला खूप पसंतीही मिळत आहे.
कोण आहे उर्वशी रादाडिया ?
उर्वशी रादाडिया ही एक प्रसिद्ध गुजराती लोकगायिका आहे. गुजरातमध्ये उर्वशी काठियावाडची कोकिळा या नावानेही प्रसिद्ध आहे. ती तिच्या 'नगर नंद जी ना लाल' गाण्याने चांगलीच प्रसिद्ध झाली. उर्वशीने वयाच्या 6 व्या वर्षी तिच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली.