कोरोना काळात लोकांना बकरीसोबत झूम कॉलची दिली ऑफर, अशीच केली ५० लाख रूपयांची कमाई.....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:37 PM2021-02-03T12:37:29+5:302021-02-03T12:43:40+5:30
लोकांना व्हिडीओ कॉल विद गोट अशी ऑफर दिली होती. ही आयडिया लोकांना इतकी आवडली की, त्याने त्यातून लाखो रूपये कमाई केली.
असं म्हणतात की, कोरोना महामारीचा फायदा श्रीमंतानी अधिक उचलला. पण तुम्ही थोडे हुशार असता तर तुम्ही सुद्धा वाहत्या गंगेत हात धुवू शकत होते. असंच काहीसं लंकाशायरच्या एका फार्मच्या मालकाने केलं. त्याने कोरोना काळात लोकांना व्हिडीओ कॉल विद गोट अशी ऑफर दिली होती. ही आयडिया लोकांना इतकी आवडली की, त्याने त्यातून लाखो रूपये कमाई केली.
इंग्लंडमधील एका फार्मचा मालक McCarthy ने आपल्या एका कर्मचाऱ्यासोबत एक प्लॅन तयार केला. प्लॅन हा होता की, लोकांना फार्ममधील बकऱ्यांसोबत झूम कॉल करण्याची ऑफर दिली जावी. याची सुरूवात तर गमतीगमतीत झाली. आणि गंमत म्हणूनच एका वेबसाइटवर जाहीरात दिली.
दुसऱ्या दिवशी फोन मिस कॉल्स आणि ई-मेल्सने भरलेला होता. या सर्वांना बकरीसोबत झूम कॉलचं बुकींग करायचं होतं. एका रिपोर्टनुसार, या फार्मने ५०० रूपयात एका बकरीसोबत झूम कॉल करण्याची ऑफर देतं. अशाप्रकारे त्याने ५० लाख रूपये कमावले. सध्या त्याच्याकडे ११ बकऱ्या आहेत.
आश्चर्याची बाब ही आहे की, अशाप्रकारची व्हिडीओ कॉल करण्याची बुकिंग करण्यात मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे कर्मचारी पुढे आहेत. लोक त्यांच्या त्यांच्या हिशेबाने वेगवेगळे बॅकग्राउंड बनवण्याची डिमांड करतात. भारी आहे ना आयडिया. कोरोना महामारीत लोकांना आपलं पोट भरणं अवघड होतं. इथे तर बकऱ्यांनी त्यांचं पोट भरलंय.