भारीच! ना घोडा, ना कार... हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला शेतकऱ्याचा लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 04:52 PM2023-05-30T16:52:55+5:302023-05-30T17:00:33+5:30

लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला घरी थाटामाटात घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं आहे.

farmer called for helicopter to see off his daughter in law | भारीच! ना घोडा, ना कार... हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला शेतकऱ्याचा लेक

फोटो - patrika.com

googlenewsNext

काही लोकांना हटके गोष्टींचा शौक असतो. अशीच एक आश्चर्यकारक घटना मध्य प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये घडली आहे. जतारा येथील चंद्रपुरा या छोट्याशा गावात राहणाऱ्या सत्यभानच्या मनात एका हटके गोष्टीचा विचार आला आणि त्याने तो आपल्या लग्नात पूर्णही केला. लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला घरी थाटामाटात घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं.

चंद्रपुरा गावातील अल्पभूधारक शेतकरी हनुमत अहिरवार यांच्या मुलाच्या लग्नाची सोमवारीही संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली होती. हेलिकॉप्टर टीकमगडला पोहोचले तेव्हा लोकांना वाटलं की, कोणीतरी मंत्री आले असावेत. मात्र जेव्हा लोकांना माहिती मिळाली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. वास्तविक हे हेलिकॉप्टर हनुमत अहिरवार यांचा मुलगा सत्यभान याने बोलावले होते. 

झाशी हायवेवर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये लग्न होतं. जेव्हा लोकांना हा प्रकार कळला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. लग्नानंतर पत्नीला हेलिकॉप्टरने घेऊन जाण्याच्या कल्पनेबाबत सत्यभान म्हणाला की, तो बारावी पास आहे. मी कामानिमित्त दिल्लीला गेलो असताना येथील शेअर बाजारातील लोकांना भेटलो. मी त्याच्यासोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा काम व्यवस्थित झाले. त्यानंतर विमानाने प्रवास सुरू केला. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा विमानात चढलो तेव्हा मला वाटलं की लग्नात हेलिकॉप्टर असेन आणि तेव्हापासून मी तयारीला लागलो. 

सत्यभानचे वडील हनुमत म्हणतात की, आमची एवढी परिस्थिती नाही. छोट्याशा शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सत्या लहानपणापासून म्हणायचा की मी तुमच्या सुनेला हेलिकॉप्टरने घेऊन येईन, तेव्हा आम्ही सर्वजण आनंदाने हसायचो, पण आज त्याने आपला मुद्दा खरा करून दाखवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: farmer called for helicopter to see off his daughter in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.