दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:21 AM2020-08-18T11:21:36+5:302020-08-18T11:37:22+5:30
हा शेतकरी पक्ष्यांसाठी पिक उगवतो. कोयम्बटूरमधील एक शेतकरी त्याच्या अर्धा एकर शेतीवर पक्ष्यांना खाण्यासाठी बाजरा आणि इतर पिक घेतो.
(Image Credit : downtoearth.org.in)
तुम्ही अशा कितीतरी घटना ऐकल्या असतील की, शेतकऱ्यांचं संपूर्ण पिक पक्ष्यांनी खराब करून टाकलं. मोठ्या मेहनतीनंतर उगवलेलं पिक वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे उपाय करत असतात. पण याच्या उलट करणारा एक शेतकरी आहे. हा शेतकरी पक्ष्यांसाठी पिक उगवतो. कोयम्बटूरमधील एक शेतकरी त्याच्या अर्धा एकर शेतीवर पक्ष्यांना खाण्यासाठी बाजरा आणि इतर पिक घेतो.
या दिलदार शेतकऱ्याचं नाव आहे मुथु मुरूगन आणि त्यांचं वय आहे ६२ वर्षे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मुरूगन हे १९९० पासून कोणत्याही खताचा वापर न करता शेती करतात. याआधी ते शेताच्या सीमांवर वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी पिक उगवत होते.
कोयम्बटूरचे राहणाऱ्या या शेतकऱ्याच्या लवकरच असं लक्षात आलं की, चारा खाण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढत आहे. पण यावेळी ते केवळ शेताच्या सीमांवरच पक्ष्यांसाठी पिक घेत होते. नंतर त्यांनी शेताच्या सीमेऐवजी अर्धा एकर जमिनीवर पक्ष्यांसाठी पिक उगवणं सुरू केलं.
(Image Credit : audubon.org)
मुरूगन यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले की, 'आम्ही एप्रिल महिन्यात ०.२५ एकरमध्ये बाजरा आणि ०.२५ एकरमध्ये चारा उगवला. एक महिन्यात पिक उगवल्यावर ते खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येऊ लागले. त्यांनी जवळपास सगळं पिक खाल्लं'.
मुरूगन हे पर्यावरणाची काळजी घेणार शेतकरी आहेत. ते पर्यावरणाच्या मुद्द्यांबाबत जागरूक राहतात. त्यांचं मत आहे की, बायोडाव्हर्सिटीसाठी पक्षी आणि प्राण्यांनी जिवंत राहणं फार गरजेचं आहे. ते म्हणाले की, 'आपण वाघ आणि हत्तीच्या भूकेबाबत बोलतो. पण पक्ष्यांसाठीही जेवण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पिक घेण्याचा मी निर्णय घेतला'.
हे पण वाचा :
कौतुकास्पद! हजारो प्राण्यांना जीवनदान देणाऱ्या 'रसिला वाढेर'!!
सर्वात विषारी सापाने एकाच वेळी दिला ३३ पिल्लांना जन्म, फोटो झालेत व्हायरल
कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं