अनेक वर्षे बंद असलेले फार्महाऊस उघडले आणि त्याचे नशिबच पालटले, आत सापडला असा मौल्यवान खजिना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 01:45 PM2021-08-22T13:45:00+5:302021-08-22T13:49:53+5:30

Jara Hatke News: अर्बन एक्सप्लोरर्स मंडळी अशा ठिकाणी जाऊन फोटो काढतात, जे अनेक वर्षांपासून बंद पडलेले आहे. परदेशांमध्ये अशा अनेक मालमत्ता आहेत ज्या अनेक वर्षांपासून बंद आहेत.

The farmhouse, which had been closed for many years, was reopened and its fortunes changed, a treasure found inside | अनेक वर्षे बंद असलेले फार्महाऊस उघडले आणि त्याचे नशिबच पालटले, आत सापडला असा मौल्यवान खजिना 

अनेक वर्षे बंद असलेले फार्महाऊस उघडले आणि त्याचे नशिबच पालटले, आत सापडला असा मौल्यवान खजिना 

Next

लंडन - एकेकाळी मौल्यवान खजिन्याच्या शोधात असलेली मंडळी डोंगराळ भाग, ओसाड गुहा अशा ठिकाणी खजिना शोधण्यासाठी जात असत. मात्र आता बदलत्या काळानुसार त्यांची शोध घेण्याची ठिकाणेही बदलली आहे. (Jara Hatke News) आता अर्बन एक्सप्लोरर्स मंडळी अशा ठिकाणी जाऊन फोटो काढतात, जे अनेक वर्षांपासून बंद पडलेले आहे. परदेशांमध्ये अशा अनेक मालमत्ता आहेत ज्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. यामध्ये राहणारे लोक ती जागा सोडू गेले आहेत किंवा या मालमत्तांचे दावेदारच हयात राहिलेले नाहीत. आता असाच एक  अर्बन एक्सप्लोरर काइल उर्बेक्स याने यू.केमधील लँकशायरमधील पॉउल्टन ली फिल्डमध्ये असलेले एक असे फार्महाऊस शोधून काढले आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. (The farmhouse, which had been closed for many years, was reopened and its fortunes changed, a treasure found inside)

पिटफिल्ड फार्मला १८८० मध्ये बनवण्यात आले होते. याच्या मालकांच्या मृत्यूनंतर हे फार्महाऊस रिकामी होते. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या घरात कुणीही गेला नव्हता. या घराला स्थानिक लोकांनी रेड पोल फार्म हाऊस असे नाव दिले होते. लेन्स लाईव्हच्या रिपोर्टनुसार हे फार्म हाऊस थॉमस थोरंटोन नावाच्या एका व्यक्तीने तयार केले होते. आता लोक याला अशा घराच्या नावाने ओळखतात, जिथे वेळ थांबला आहे.

थॉमस थोरंटोनची मुलगी मेरी हिने लोकल रेल्वेमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत विवाह केला होता. त्यानंतर ते दोघे या फार्म हाऊसमध्ये राहायचे. या जोडप्याला एक मुलगी झाली. तिने मोठे झाल्यावर थॉमस नावाच्या एका व्यक्तीसोबत विवाह केला, तेही याच घरात राहायचे. २०१३ मध्ये हे दोघे घरात राहायचे मात्र नंतर थॉमसचा मृत्यू झाला. मग पतीच्या आठवणींसोबत मेरी इथे राहायची. मात्र तीन वर्षांपूर्वी तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर या घराला कुणीही वारस उरला नाही. त्यामुळे हे घर रिकामी राहिले.

दरम्यान, या घराचे दोन जॉईंट ओनर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कन्फ्युजनमुळे कुणीही घरात राहत नाही. जेव्हा या घराचे दरवाजे उघडले गेले. तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. घरामध्ये सर्व वस्तू अगदी काल परवा ठेवल्यासारख्या होत्या. घरामध्ये १८०० च्या काळातील अनेक वस्तू होत्या काइलने या घराबाबत ऐकले होते. त्यामुळे तो इथे पोहोचला होता. घराच्या आत धुळीचा मोठा थर साचलेला होता. घरातील प्रत्येक वस्तू खास होती. त्यामध्ये अनेक वर्षे जुना टीव्ही सेट, वृत्तपत्र सारे तिथेच ठेवलेले होते.

दरम्यान, घराच्या गॅरेजमध्ये जाताच काइलच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला गॅरेजमध्ये एक विंटेज कार सापडली. तिला पाहून तिची किंमत काही कोटींच्या घरात असेल, याची जाणीव काइलला झाली. तसेच घरातील किचनमध्ये डायनिंग टेबलवर ठेवलेल्या प्लेट्स विंटेज डिझाइनच्या होत्या. काईलने या घराचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, एक असे घर जे तुम्हाला अनेक वर्षेआधीच्या काळात घेऊन जाईल, हे तेच घर आहे.  

Web Title: The farmhouse, which had been closed for many years, was reopened and its fortunes changed, a treasure found inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.