उत्तमं दद्ददात् पादं; सूरतमध्ये धमाकेदार स्पर्धा, 'मोठा आवाज' काढणारा जिंकणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:51 AM2019-09-16T11:51:58+5:302019-09-16T11:55:59+5:30
जगभरात वेगवेगळ्या विचित्र स्पर्धा नेहमीच होत राहतात. खासकरून परदेशात विचित्र अशा स्पर्धा अनेक होतात.
जगभरात वेगवेगळ्या विचित्र स्पर्धा नेहमीच होत राहतात. खासकरून परदेशात विचित्र अशा स्पर्धा अनेक होतात. मात्र, आपल्या गुजरातमध्ये अशीच एक धमाकेदार आणि अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेबाबत वाचून तुम्ही हैराण तर व्हालच सोबतच हसून हसून लोटपोटही व्हाल.
सूरज शहरात येत्या २२ तारखेला चक्क पादण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना विचित्र पद्धतीने पादावं लागणार आहे. जो स्पर्धक जेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने हे काम करेल त्याला तेवढं जास्त बक्षीस रकमेच्या रूपात मिळेल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला १०० रूपयांचं रजिस्ट्रेशन करावं लागेल.
सूरतमधील यतीन संगोई एके दिवशी घरी परिवारासोबत टीव्ही बघत होते. दरम्यान त्यांच्या पादण्याचा जोरदार आवाज आला. अशात घरातीलच कुणीतरी त्यांना चिमटा काढण्यासाठी म्हटलं की, जर पादण्याची स्पर्धा झाली तर तुम्ही जिंकाल.
त्यानंतर यतीन यांच्या डोक्यात या स्पर्धेचा विचार सतत घोळत होता. त्यानंतर त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. इतकेच नाही तर या धमाकेदार स्पर्धेत भाग घेण्यासाठी आतापर्यंत ३० पेक्षा अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं आहे.
यतीन संगोई यांनी सांगितले की, सूरतच नाही तर देशातील वेगवेगळ्या शहरांमधूनही या स्पर्धेत रस असणाऱ्यांचे फोन येत आहेत. तसेच ते म्हणाले की, आशा आहे की, या पाद स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल.
या स्पर्धेत तीन परिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच यात विजेता ठरणाऱ्या स्पर्धकाला एक ट्रॉफी दिली जाणार आहे. सोबतच बक्षीस म्हणून काही रक्कमही दिली जाणार आहे. यासाठी तीन श्रेणी आहेत. सर्वात जास्त वेळ पादणे, सर्वात जास्त आवाज करणारा आणि सर्वात सुरेल अशा तीन श्रेणी आहेत. त्या त्यानुसार त्यांना बक्षीस दिलं जाईल.