पत्नीवर संशय घेऊन पतीने केली मुलीची डीएनए टेस्ट, समोर जे आलं त्याने बसला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 05:41 PM2024-02-27T17:41:35+5:302024-02-27T17:43:32+5:30
महिलेने लिहिलं की, ती तिच्या पतीसोबत कॉलेजमध्ये शिकत होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते आणि त्यांनी लग्न केलं. दोघांचा संसार आनंदात सुरू होता. त्यांना एक मुलगीही झाली होती.
पती-पत्नीचं नातं फार लांब चालत असतं, पण तेव्हाच जेव्हा दोघांमध्ये प्रेम, विश्वास आणि सन्मानाची भावना असते. विश्वासाशिवाय हे नातं टिकू शकत नाही. जर असं नसेल तर अशात लोक एकमेकांपासून वेगळे होतात. एका पतीला त्याच्या पत्नीवर संशय आला तेव्हा त्याने मुलीची DNA टेस्ट केली. जे समोर आलं तेव्हा पतीला समजलं की, पत्नीने दगा दिला आहे. पण सत्य काही वेगळंच होतं. या टेस्टमधून दोघांच्या जीवनातील एक मोठं सत्य समोर आलं.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर असे अनेक ग्रुप्स आहेत ज्यावर लोक आपल्या समस्या शेअर करतात आणि लोकांकडून सल्ले मागतात. नुकतीच एका महिलेने आपलं नाव न सांगता तिचा पती आणि मुलीसंबंधी एक अशी घटना शेअर केली जी वाचून सगळेच हैराण झाले. या घटनेमुळे त्यांचा संसार मोडण्याच्या वाटेवर आहे. r/BestofRedditorUpdates नावाच्या एका ग्रुपवर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. जी व्हायरल झाली. काही वर्ष जुन्या या पोस्टमध्ये महिलेने सांगितलं होतं की, तिचं वय 29 आहे आणि तिचा पती 31 वयाचा आहे.
महिलेने लिहिलं की, ती तिच्या पतीसोबत कॉलेजमध्ये शिकत होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते आणि त्यांनी लग्न केलं. दोघांचा संसार आनंदात सुरू होता. त्यांना एक मुलगीही झाली होती. पण मुलीचे डोळे घारे होते. तर पती-पत्नीचे डोळे निळे होते. अशात पतीला पत्नीवर संशय होऊ लागला होता.
त्याने मुलीची डीएनए टेस्ट केली. जी मॅच झाली नाही. अशात त्याला वाटलं की, पत्नीने त्याला दगा दिला आहे. ही मुलगी त्याची नाही. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. पत्नीने पोस्टमध्ये पुन्हा पुन्हा हे सांगितलं की, तिने पतीला अजिबात दगा दिलेला नाही. पतीसोबत लग्न करण्याआधी तिचे दोन अफेअर होते, पण जेव्हा तिने पतीला डेट करणं सुरू केलं तिने दुसऱ्या पुरूषाकडे पाहिलंही नाही. पण हे पतीला मान्य नाही.
पत्नीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, तिला परिवार दूर गेल्याचं बघवत नव्हतं. पती घटस्फोटाची मागणी करत होता. पण तिने कसंतरी पतीला दुसऱ्या टेस्ट्ससाठी तयार केलं. हॉस्पिटलमध्ये जेव्हा बाकी टेस्ट झाल्या तेव्हा त्यातूनही हेच समोर आलं की, ही मुलगी त्यांची नाही. पण पत्नीने पतीला सांगितलं की, तिने त्याला दगा दिला नाही.
अशात त्यांना समजलं की, जेव्हा त्यांना बाळ झालं होतं तेव्हा हॉस्पिटलमधील लोकांनी त्यांचं बाळ दुसऱ्या बाळासोबत अदलाबदली केलं असेल. याच कारणाने डीएनए टेस्ट मॅच झाली नाही. आता दोघांनी हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आता महिलेला या गोष्टीची चिंता आहे की, ती हे सगळं तिच्या मुलीला कसं सांगेल. कारण ती जास्त मोठी नाही.