नववधूला लग्नात खास गिफ्ट! हुंडा नाकारत सासऱ्याने दिली 14 लाखांची आलिशान कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:53 AM2022-02-21T11:53:35+5:302022-02-21T12:17:14+5:30

Marriage : मुलगा विकास जम्मूमध्ये भारतीय लष्कराचा जवान आहे आणि वधू नयाबासमध्ये तृतीय श्रेणी शिक्षिका आहे.

Father in law gave a luxury car of 14 lakhs to the bride by not taking dowry in the marriage | नववधूला लग्नात खास गिफ्ट! हुंडा नाकारत सासऱ्याने दिली 14 लाखांची आलिशान कार

नववधूला लग्नात खास गिफ्ट! हुंडा नाकारत सासऱ्याने दिली 14 लाखांची आलिशान कार

googlenewsNext

नवी दिल्ली : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील नीमकाथाना भागात एका लग्नात वराच्या वडिलांनी हुंडा न घेता वधूला 14 लाख रुपयांची कार भेट देऊन समाजाला वेगळा संदेश दिला आहे. हे प्रकरण नीमकाथाना भागातील आगवाडी येथील आहे. सिरोही सरपंचाच्या प्रेरणेने सासरच्यांनी मुलाच्या लग्नासाठी हुंडा न घेता नववधूला 14 लाख रुपयांची कार भेट दिली, त्यातून समाजाला हृदयस्पर्शी संदेश गेला. तसेच, या निर्णयामुळे लोक त्यांचे प्रचंड कौतुक करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नीमकाथाना उपविभागातील आगवाडी गावातील रहिवासी अर्जुनलाल चंदेलिया यांचा धाकटा मुलगा विकास याचे लग्न नीमकाथाना उपविभागातील कैरावली गावातील ओम प्रकाश बुडानिया यांची मुलगी निरमा हिच्याशी झाले आहे. मुलगा विकास जम्मूमध्ये भारतीय लष्कराचा जवान आहे आणि वधू नयाबासमध्ये तृतीय श्रेणी शिक्षिका आहे. 18 फेब्रुवारीला विकासचे लग्न झाले. 

अर्जुनलाल यांचा मोठा मुलगा योगेश सुद्धा डॉक्टर आहे. अर्जुनलाल चंदेलिया हे स्वतः भारतीय लष्कराचे माजी मानद कॅप्टन राहिले आहेत. अर्जुनलाल चंदेलिया यांनी मुलाच्या लग्नात हुंडा न घेवून समाजाला वेगळा संदेश दिला. हुंडा प्रथेच्या विरोधात अर्जुनलाल चंदेलिया यांनी आपली सून निरमा हिला 14 लाख रुपयांची कार भेट दिली. हे पाहून परिसरातील लोकांना नवल वाटले आणि लोक या नवीन ट्रेंडचे कौतुक करत आहेत.

अर्जुनलाल चंदेलिया यांनी सांगितले की, माझे जावई सरपंच सिरोही यांनी मला माझ्या मुलाचे लग्न हुंडा न घेता करण्याची प्रेरणा दिली. जयप्रकाश कास्वा यांनी सांगितले की, ही एक शिक्षक, प्रगत कुटुंबाची ओळख आहे, ज्याने अशी हुंडा प्रथा संपुष्टात आणून सुनेला मुलीचा समान दर्जा दिला पाहिजे आणि वधू-वर दोघांचे नाते मधुर असावे, याचे एक उदाहरण आहे. हे लग्न होते आणि या लग्नाशी संबंधित सर्वांनी खूप कौतुक केले आहे.

Web Title: Father in law gave a luxury car of 14 lakhs to the bride by not taking dowry in the marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.