मुलगा आणि सूनेने अपमान केला म्हणून वडिलांनी प्रॉपर्टी सरकारला केली दान, किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 01:36 PM2023-03-07T13:36:04+5:302023-03-07T13:38:50+5:30

एका वृद्ध व्यक्तीने दावा केला की, त्याच्या मुलाने आणि सूनेने अनेकदा त्याचा अपमान केला.

Father insulted by son he gave his property worth crores to the up government know whole reason | मुलगा आणि सूनेने अपमान केला म्हणून वडिलांनी प्रॉपर्टी सरकारला केली दान, किंमत वाचून व्हाल अवाक्

मुलगा आणि सूनेने अपमान केला म्हणून वडिलांनी प्रॉपर्टी सरकारला केली दान, किंमत वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

Father Son News: जेव्हा कुणी आपलंच अपमान करतं तेव्हा फार वाईट वाटतं. त्यातून अनेक वाईट घटना घडतात किंवा लोक मनातून उतरतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बुधनामधून समोर आली आहे. एका वृद्ध व्यक्तीने दावा केला की, त्याच्या मुलाने आणि सूनेने अनेकदा त्याचा अपमान केला.

शेवटी त्याला वृद्धाश्रमात जावं लागलं. 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीसोबत कथितपणे त्याचा मुलगा आणि सूनेने गैरवर्तन केलं होतं. याला वैतागून त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी ज्याची किंमत साधारण एक कोटी रूपये होती ती यूपी सरकारला दिली.

वृद्ध व्यक्तीने उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या नावे आपली प्रॉपर्टी केली आणि त्यांना निवेदन दिलं की, त्याच्या प्रॉपर्टीवर शाळा किंवा हॉस्पिटल बांधलं जावं. खतौली भागातील नाथू सिंह यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांची जमीन राज्यपालांना देण्यासाठी उप निबंधक कार्यालयात शपथपत्र दाखल केलं होतं.

नाथू सिंह मूळचे बिराल गावात राहणारे आहेत. बुढ़ाना तहसीलचे सब-रजिस्ट्रार पंकज जैन यांनी खुलासा केला की, 4 मार्चला नाथू सिंह यांनी आपली संपत्ती आणि जमीन राज्यपालांच्या नावे केली. ज्याची किंमत साधारण एक कोटी रूपये आहे.

नाथू सिंह यांनी लिहून दिलं की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉपर्टीचा वापर शाळा बांधण्यासाठी किंवा हॉस्पिटल बनवण्यासाठी केला जावा. वृद्धाश्रमात राहणारे नाथू सिंह यांच्यानुसार, त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्यासोबत व्यवस्थित वागत नसल्याने ते जमीन राज्यपालांच्या नावे करत आहेत. 

Web Title: Father insulted by son he gave his property worth crores to the up government know whole reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.