युवक हैराण, पहिली पत्नीच बनून आली सावत्र आई; घरात ‘भाऊ’देखील सापडला, पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 12:36 PM2021-07-04T12:36:21+5:302021-07-04T12:38:17+5:30

दोन्ही पक्षकारांमध्ये वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु बैठकीत वडील आणि मुलगा दोघंही आक्रमक झाले होते असं पोलिसांनी सांगितले.

Father marries his son's ex-wife in UP | युवक हैराण, पहिली पत्नीच बनून आली सावत्र आई; घरात ‘भाऊ’देखील सापडला, पोलीस चक्रावले

युवक हैराण, पहिली पत्नीच बनून आली सावत्र आई; घरात ‘भाऊ’देखील सापडला, पोलीस चक्रावले

Next
ठळक मुद्देपहिल्या लग्नाचे कोणतेही कागदपत्रे पुरावे नाहीत कारण दोघंही अल्पवयीन होते. युवकाचे वडील आणि मुलीचा सध्याचा नवरा हे सफाई कर्मचारी आहेत. त्यांचे वय ४५ ते ५० वयोगटातील आहे. शनिवारी पोलिसांनी या दोन्ही पक्षकारांमध्ये तोडगा काढण्यासाठी एक बैठक बोलावली

बदायू – उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात एक अजबगजब घटना समोर आली आहे. याठिकाणी एका युवकाची पहिली पत्नी आता त्याची आई बनली आहे. इतकचं नाही तर या पहिल्या पत्नीपासून त्याला एक भाऊदेखील आहे. जो त्याच्या वडिलांचे अपत्य आहे. या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा युवकाने जिल्हा पंचायत कार्यालयात एका आरटीआयद्वारे त्याच्या वडिलांची माहिती मागवली होती. कुटुंबाला सोडून त्याचे वडील दूर राहत होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवकाचं लग्न २०१६ मध्ये एका मुलीसोबत झालं होतं. दोघंही अल्पवयीन होते. लग्नाच्या केवळ ६ महिन्यातच दोघं वेगळे झाले. अलीकडेच युवकाने पुन्हा मुलीसोबत तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने तलाकवर जोर देत मुलाला दारूचं व्यसन असल्याचं सांगितले. त्यानंतर युवकाला माहिती पडले की, त्याच्या वडिलांनीच त्या मुलीसोबत लग्न केले आहे. तेव्हा त्याने बिसौली पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल केली.

त्यानंतर शनिवारी या दोन्ही पक्षकारांमध्ये तोडगा काढण्यासाठी एक बैठक बोलावली. पोलिसांनी सांगितले की, आम्ही दोन्ही पक्षकारांमध्ये वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु बैठकीत वडील आणि मुलगा दोघंही आक्रमक झाले होते. मुलाने दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी केली जात असून पोलीस कायद्यानुसार कारवाई करेल. मात्र जी मुलगी तिच्या आधीच्या नवऱ्याची सावत्र आई बनली आहे. तिने आधीच्या नवऱ्याकडे जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ती दुसऱ्या पतीसोबत सुखी आहे असं मुलगी म्हणत आहे अशी माहिती अधिकारी विनय चौहान यांनी दिली.

त्याचसोबत पहिल्या लग्नाचे कोणतेही कागदपत्रे पुरावे नाहीत कारण दोघंही अल्पवयीन होते. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकत नाही. दोन्ही पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटिस बजावली आहे. युवकाचे वडील आणि मुलीचा सध्याचा नवरा हे सफाई कर्मचारी आहेत. त्यांचे वय ४५ ते ५० वयोगटातील आहे. तर मुलीचं वय त्यांच्या निम्मे आहे. आणि त्यांना एक मुलगाही आहे. मात्र या प्रकारामुळे प्रशासनही हैराण झालं आहे.

Web Title: Father marries his son's ex-wife in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.