ऑफर सुरू होती म्हणून केली संपूर्ण कुटुंबाची DNA Test अन् 'बाप' निघाला कुणी दुसराच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 02:32 PM2022-11-16T14:32:57+5:302022-11-16T14:35:24+5:30

कसा उघडकीस आला सगळा प्रकार, नक्की काय घडलं... वाचा सविस्तर

Father shocked after secret revealed from DNA test that it is not his son secret reveled then what happened read details | ऑफर सुरू होती म्हणून केली संपूर्ण कुटुंबाची DNA Test अन् 'बाप' निघाला कुणी दुसराच

ऑफर सुरू होती म्हणून केली संपूर्ण कुटुंबाची DNA Test अन् 'बाप' निघाला कुणी दुसराच

googlenewsNext

Father Shocked after Son reports: एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाची DNA Test केली. अहवाल पाहून पती-पत्नी दोघांनाही धक्काच बसला. त्याचे कारण म्हणजे मुलाच्या DNA चाचणीच्या रिपोर्ट्सनुसार त्या मुलाचे वडील दुसरेच कोणीतरी असल्याचे अहवालातून समोर आले. मुलाच्या डीएनए चाचणीत असा खुलासा झाला की तो ऐकून पालकांना झटकाच बसला. ज्या मुलाला हे जोडपे आपला मुलगा मानत होते, त्याचा पिता दुसराच कोणीतरी निघाला. न्‍यूयॉर्क पोस्‍टच्या रिपोर्ट्सनुसार अमेरिकेतील डोना जॉनसन और व्हॅनर जॉनसन या जोडप्यासंदर्भात हा प्रकार घडला.

नक्की काय घडला प्रकार?

जॉनसन जोडपे ज्याला आपला मुलगा मानत होते, तो त्यांचा मुलगाच नाही हा प्रकार अतिशय धक्कादायकरित्या उघड झाला. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, 23andMe चाचणीच्या DNA चाचणी अहवालात टिम हा जॉनसन जोडप्याचा मुलगा नसल्याचे उघड झाल्यानंतर डोना जॉन्सन आणि व्हॅनर जॉन्सन यांना जबर धक्का बसला. '23andMe चाचणी' यूएस मध्ये DNA चाचणी आणि अनुवांशिक सेवा प्रदान करते. चाचणीचा अहवाल पाहिल्यावर या जोडप्याला कळले की IVF क्लिनिकने त्यांचे शुक्राणू बदलले आहेत, ज्यामुळे हे घडले. खरं तर, डोना आणि व्हॅनर ज्या IVF क्लिनिकमध्ये गेले होते, त्या क्लिनिकने चुकून त्यांचे सॅम्पल बदलले.

घोळ लक्षात आल्यानंतर पुढे काय घडलं?

उटाह (यूएसए) मध्ये राहणाऱ्या डोना आणि व्हॅनर यांनी DNA चाचणीसाठी संपूर्ण कुटुंबाचा डीएनए '23andMe' कंपनीला दिला. त्यावेळी ही कंपनी एक ऑफर देत होती. या चाचणीत या जोडप्याची मुले Vanner III आणि टिम यांचाही सहभाग होता. डीएनए चाचणीत टीमच्या वडिलांची ओळख 'अज्ञात' (Unknown) लिहून आले. हे पाहून वडील व्हॅनर यांचा विश्वास बसेना. यानंतर, पुढील तपास वर्षभर चालला, ज्यामध्ये हे उघड झाले की IVF क्लिनिकने डोनाच्या गर्भधारणेसाठी दुसऱ्याच्या शुक्राणूंचा वापर केला गेला होता. DNA चाचणीत असे दिसून आले की मुलगा टिमचे वडील डेव्हिड मॅकनील आहेत. पत्नीच्या गर्भधारणे दरम्यान, IVF क्लिनिकच्या चुकीमुळे शुक्राणू बदलले गेले. नंतर ज्या व्यक्तीचे शुक्राणू वापरण्यात आले होते ती व्यक्ती देखील सापडली.

जॉनसन कुटुंब आणि मुलाचे पिता डेव्हिड मॅकनील एकत्र

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Father shocked after secret revealed from DNA test that it is not his son secret reveled then what happened read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.