३०० किलो वजन, ३० सिगरेट, ४ लिटर कोल्डड्रिंक! असं होतं 'या' व्यक्तीचं थक्क करणारं डाएट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:46 AM2022-09-21T08:46:09+5:302022-09-21T08:47:06+5:30
ब्रिटनच्या सर्वात वजनदार माणसाचे नाव जेसन हॉल्टन आहे, तो 32 वर्षांचा आहे. एकदा मेडिकल इमर्जन्सी असताना त्याला क्रेनच्या माध्यमातून बाहेर काढावं लागलं होतं.
सुस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपलं वजन वाढतं. वजन वाढणं आणि कमी होणं हे खाण्याच्या सवयीवर अवलंबून असतं, त्यामुळे प्रत्येकानं आपल्या खाण्याच्या सवयी बरोबर ठेवाव्यात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माणसाची स्थिती इतकी बिघडते की काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो आणि अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
काही काळापूर्वी, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीचं वजन सुमारे 320 किलो पर्यंत पहोचलं होते. त्याचे वजन इतकं वाढलं होतं की त्याला मेडिकल इमर्जन्सीसाठी खिडकी तोडून क्रेनच्या माध्यमातून रुग्णालयात पोहोचवावं लागलं होतं. त्यानं द सन ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यानं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सांगितलं.
कोण आहे ही व्यक्ती?
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आणि युकेमधील सर्वात वजन असलेल्या या व्यक्तीचं नाव जेसन होल्टन आहे. त्याचं वय 32 वर्षे आहे. त्याचं वजन 320 किलो होतं. परंतु त्यानं आता आपलं काही प्रमाणात कमी केल्याचं म्हटलं जात आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे प्राण वाचल्याचंही सांगण्यात आलंय. एकदा मेडिकल इमर्जन्सीदरम्यान त्याला त्वरित रुग्णालयात नेण्याची गरज भासली. परंतु त्यावेळी त्याचं वजन इतकं होतं की त्याला रुग्णालयात नेण्यासाठी 30 फायरमेन आणि इंजिनिअर्सच्या टीमनं क्रेनच्या सहाय्यानं सात तासांत रुग्णालयात पोहोचवलं.
सिगरेट, कोल्डड्रिंक सोडलं
द सननुसार त्याचं वजन आता 298 किलो आहे. त्याला ऑनलाइन फूड ऑर्डर करण्याची सवय लागली होती. जेव्हा वाटायचं तेव्हा तो ऑनलाइन फूड मागवायचा. यामुळे त्याचं वजन इतकं वाढलं आणि 320 किलोंपर्यंत पोहोचलं. जेसन एकदा एका रात्रीत 3 ते 4 लिटर कोल्डड्रिंक प्यायला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर त्यानं ब्रिटनच्या मेडिकल इमर्जन्सी नंबरवर फोन केला आणि टीम त्याच्या बचावासाठी पोहोचले. वजन वाढल्यामुळे शरीराराला त्रास होत आणि रक्ताच्या गाठी बनत असल्याचंही त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्याला यासाठी औषध देण्यात आलं आणि नंतर किडनी खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या शरीरात मशीननं पाणी सोडण्यात आलं.
असं होतं डाएट
सुरूवातीला लंचमध्ये तीन मोठे चिकन नूडल्स, झिंगा क्रॅकर्स, झिंगा टोस्ट तो खात असे. त्यानंतर रात्रीच्या खाण्यात पनीर सँडव्हिच, दोन चॉकलेट बार, क्रिस्पचे तीन पॅकेट्स, दीड लिटर संत्र्याच्या ज्युस आणि पाच सॉफ्टड्रिंकचे कॅन घ्यायचा. याशिवाय दिवसाला किमान 30 सिगरेट्स तो ओढत होता.
“सध्या मला चोवीस तासात केवळ दीड लिटर लिक्विड दिलं जातं. खाण्यासाठी काहीही दिलं जात नाही. मला खुप तहान लागते. जर मला काही प्यायला दिलं नाही तर मी पोलिसांना फोन करेन की डिहायड्रेट झाल्यानंतरही मला काही प्यायला दिलं जात नाही. मी बेडवरून उठूही शकत नाही आणि कुठे जाऊदेखील शकत नाही. मला आजारी असल्याचं वाटत आहे. पहिले मी दिवसाला तीन ते चार लिटर कोल्डड्रिंक पित होतो. परंतु आता मला केवळ 100-100 मिली. लिक्विड दिलं जातं,” असं जेसननं मुलाखतीदरम्यान सांगितलं.