सौदीत 'पोकेमॉन गो' विरोधात फतवा
By admin | Published: July 21, 2016 07:36 AM2016-07-21T07:36:21+5:302016-07-21T07:36:21+5:30
सौदी अरेबियामध्ये पोकेमॉन गो गेमविरोधात फतवा काढण्यात आला असून असे प्रकार मुस्लीम धर्मात व्यर्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
रियाध, दि. 21 - पोकेमॉन गो गेम सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. तरुणालाईला तर या गेमने अक्षरक्ष: वेड लावलं आहे. दिवसेंदिवस या गेमची लोकप्रियता वाढू लागली आहे. मात्र काही ठिकाणी या गेमला विरोध होतानाही दिसत आहे. सौदी अरेबियामध्ये पोकेमॉन गो गेमविरोधात फतवा काढण्यात आला असून असे प्रकार मुस्लीम धर्मात व्यर्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सौदीतील एका धार्मिस संस्थेने हा फतवा काढला आहे. याअगोदरही या संस्थेने 2001 मध्ये पोकेमॉन गो गेमविरोधात फतवा काढत हा गेम झुगार असल्याचं सांगितलं होतं. अधिकृतपणे हा गेम सौदीमध्ये उपलब्ध नसला तरी अनेकजणांनी बेकायदेशीरपणे हा गेम डाऊनलोड केला असल्याची माहिती मिळत आहे.
पोकेमॉन गोच्या लोकप्रियतेमुळे गेम लाँच करणाऱ्या नितांडो कंपनीचं नशिब पालटलं आहे. कंपनीचा शेअर 12 दिवसात 53 टक्क्यांनी म्हणजेच 95 हजारांनी वाढला आहे. पोकीमॉन हा गेम सध्या भारतात उपलब्ध नाही. पण लवकरच भारतातही लाँच होणार आहे.
कसा खेळायचा पोकेमॉन -
अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित नीअँटिक या गेमिंग कंपनीने लहान मुलांच्या विश्वातील लोकप्रिय कार्टून मालिकेतील पोकेमॉन या कार्टून कॅरेक्टरला केंद्रस्थानी ठेवून हा गेम तयार केला आहे. हा गेम खेळण्यासाठी आपल्या मोबाइलमधील जीपीएस या तंत्राचा वापर अनिवार्य आहे. जीपीएस यंत्रणा चालू करून हा गेम खेळण्यास सुरुवात करण्यासाठी वापरात असलेला मोबाइल हा हातात घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष स्वत:हून वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागते. ही भटकंती चालू असताना तुम्ही प्रत्यक्ष जगात म्हणजेच तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी सध्या कुठे आहात हे या गेममध्ये तपासले जाते आणि हा गेम खेळताना तुमच्या मोबाइलवर ते तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून नकाशावर दाखवले जाते. आत्ता हा गेम तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या आसपास आभासी जगतात तुमच्या मोबाइलवरील नकाशात त्या ठिकाणी पोकेमॉन कुठे लपले आहेत ते तुम्हाला दाखवते; आणि तुम्हाला त्या पोकेमॉनला पोकबॉल या एक चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टीला पोकेमॉनकडे फेकून पोकेमॉनला तुमच्या जाळ्यात पकडावे लागते. या गेमची संरचना अशा प्रकारे केली असल्याने हा गेम एका ठिकाणी किंवा एका विशिष्ट जागेच्या परिघात बसून खेळणे अशक्य आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यासाठी प्रत्यक्ष घराबाहेर पडणे हे भाग पडते आणि जास्तीतजास्त पोकेमॉन पकडण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावे लागते. दुसरी बाब अशी की हा गेम एकट्याने जरी खेळावा लागत असला तरी तो खेळणारे इतर लोक हे तुमच्यासोबत स्पर्धा करतात.