या शाळेची फी आहे १ कोटी ३५ लाख

By admin | Published: March 30, 2017 01:41 AM2017-03-30T01:41:12+5:302017-03-30T01:41:12+5:30

शाळेच्या फीमुळे अनेकदा पालक त्रस्त होतात. भारतात अनेक खासगी शाळांची फी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे

The fee for this school is 1 crore 35 lakhs | या शाळेची फी आहे १ कोटी ३५ लाख

या शाळेची फी आहे १ कोटी ३५ लाख

Next

ज्युरिक : शाळेच्या फीमुळे अनेकदा पालक त्रस्त होतात. भारतात अनेक खासगी शाळांची फी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे; पण या शाळेची फी ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो. ही शाळा आहे स्वीत्झर्लंडमधील. इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल इन्स्टिट्यूट आॅफ ले रोजे या शाळेची फी आहे वार्षिक १ कोटी ३५ लाख रुपये. यात शाळेच्या फीसह अन्य खर्चही समाविष्ट आहे. या शाळेची स्थापना १८८० मध्ये पॉल एमिली कार्नल यांनी केली होती. येथे पाच विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आहे. शाळेचे सर्व विद्यार्थी कॅम्पसमधील बोर्डिंगमध्येच राहतात. येथील अभ्यासक्रम इंग्रजी आणि फें्रच भाषेत आहे. येथे विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळण्याचीही सुविधा आहे. अनेक शाही परिवाराच्या मुलांनी येथे शिक्षण घेतलेले आहे. सध्या येथे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा डोंगराच्या कुशीत वसलेली असून, त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

Web Title: The fee for this school is 1 crore 35 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.