ती मित्राच्या पत्नीच्या पडली प्रेमात, मग तिघांनीही सोबत राहण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:33 AM2023-02-10T10:33:40+5:302023-02-10T10:40:02+5:30

Love Story : ही कहाणी आहे पिद्दू कौर, स्पीटी सिंह आणि सनी सिंह यांची. एका व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Fell in love with a close friends wife all three took such a decision | ती मित्राच्या पत्नीच्या पडली प्रेमात, मग तिघांनीही सोबत राहण्याचा घेतला निर्णय

ती मित्राच्या पत्नीच्या पडली प्रेमात, मग तिघांनीही सोबत राहण्याचा घेतला निर्णय

googlenewsNext

Love Story : लग्नाच्या काही महिन्यांनंतर एक महिलेचं पतीसोबत भांडण झालं. ते दोघे वेगळे झाले. नंतर महिला आपल्या एका विवाहित पुरूष मित्राच्या घरी गेली. इथे पुरूष मित्राची पत्नी आणि महिलेमध्ये काही भावना निर्माण झाल्या. नंतर तिघांनीही सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि Throuple रिलेशनशिपमध्ये राहू लागले. ही कहाणी आहे पिद्दू कौर, स्पीटी सिंह आणि सनी सिंह यांची. एका व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

पिद्दू, स्पीटी आणि सनी मुळचे भारतीय आहेत. पण बऱ्याच वर्षापासून अमेरिकेत शिफ्ट झाले होते. 2009 मध्ये पिद्दूचं अरेंज मॅरेज झालं होतं. पण काही महिन्यात पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर पिद्दू ती राहत असलेल्या कॅलिफोर्नियाहून इंडियाना येथे मित्र सनीकडे गेली. सनी इथे स्पीटीसोबत राहत होता.

सनीच्या घरी आठवडाभर राहिल्यानंतर पिद्दू आणि स्पीटी जवळ आल्या. त्यांच्या प्रेमाची भावना निर्माण झाली. दोघींनी हे सनीला सांगितलं आणि मग सहमतीने तिघेही रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांना चार मुलंही आहेत.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 18 वयात अमेरिकेत शिफ्ट होण्याआधी स्पीटी एका दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली होती. लग्नाच्या एका वर्षात स्पीटीने बिनधास्तपणे सनीला तिच्या समलैंगिक संबंधाबाबत सांगितलं होतं. जे सनीने स्वीकारलं होतं.

सनीसोबतच्या रिलेशनबाबत स्पीटीने व्हिडीओत सांगितलं की, आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. सनी आणि मी बालपणापासून एकमेकांना ओळखतो. पंजाबमध्ये जन्मल्यानंतर सनी आपल्या आई-वडिलांसोबत न्यूयॉर्कला गेला होता. तेव्हा तो 8 वर्षांचा होता. आम्ही अनेक वर्ष डेट केलं आणि 2003 मध्ये लग्न केलं.

स्पीटी सांगते की, पिद्दू आमच्यात आल्यापासून सुरूवातील खूप सांभाळून रहावं लागलं. भावनांवर कंट्रोल, जेलसी, रोमान्ससाठी वेळेची विभागणी अशा अनेक गोष्टींवर सहमती बनण्यास वेळ लागला. काळानुसार सगळं ठीक झालं.

या नात्यासाठी तिघांचेही परिवार तयार नव्हते. त्यांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले. इतकंच काय तर नातेवाईकांनी त्यांना लग्नात बोलवणंही बंद केलं. सनीची आई सांगते की, मला सुरूवातीला मुलांच्या आणि सनीच्या आनंदाची भीती होती. पण त्याने सगळं काही सांभाळून घेतलं. तेच स्पीटीची आई म्हणाली की, मी अशा रिलेशनशिपबाबत आधी कधी ऐकलं नव्हतं. जर मुलं खूश आहेत तर मग काय...

Web Title: Fell in love with a close friends wife all three took such a decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.