Love Affair: मिस कॉलवरून झालं प्रेम, लग्नानंतर मिळाला दगा; पत्नीने चपलेने केली पतीची धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 13:12 IST2022-09-15T13:12:24+5:302022-09-15T13:12:51+5:30
Fell In Love With Miss Call: मिस कॉलच्या माध्यमातून तिची ओळख बेला येथे राहणाऱ्या मनोहरसोबत झाली होती. मनोहरने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मार्चमध्ये तिच्यासोबत लग्न केलं.

Love Affair: मिस कॉलवरून झालं प्रेम, लग्नानंतर मिळाला दगा; पत्नीने चपलेने केली पतीची धुलाई
Fell In Love With Miss Call: जहानाबादमध्ये एका महिलेने तिच्या पतीला भर रस्त्यात चपलेने मारलं. कारण लग्नानंतर त्याने तिला दगा दिला. यावेळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. ही घटना पटणाच्या गया रेल्वे खण्डच्या कोर्ट हॉल्ट स्टेशनची आहे. भर दिवसा पतीला पकडून त्याची चप्पलने धुलाई केली. त्यानंतर तिने पतीने लग्न करून फसवल्याचा पतीवर आरोप केला. विवाहित महिलेने सांगितलं की, मिस कॉलच्या माध्यमातून तिची ओळख बेला येथे राहणाऱ्या मनोहरसोबत झाली होती. मनोहरने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मार्चमध्ये तिच्यासोबत लग्न केलं. त्याने तिला दिल्लीला नेलं.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवताना त्याने तो अविवाहित असल्याचं सांगितलं होतं. पण नंतर जेव्हा तो दिल्लीहून तिला आपल्या घरी बेला येथे घेऊन गेला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलेही होते. ज्यानंतर दोघांमध्ये वाद पेटला आणि घटस्फोट घेण्यासाठी दोघेही कोर्टात गेले. पण पती कोर्टात वेळेवर पोहोचला नाही. पत्नीला पती कोर्टाच्या बाहेर दिसला. ज्यानंतर पत्नी संतापली आणि त्याला पकडून चांगलीच मारहाण केली.
आधी तर तो पत्नीच्या हातातून निसटला होता. पण तिथे उपस्थित लोकांनी त्याला पुन्हा पकडलं. पकडला गेल्यानंतर लोकांनी त्याला त्याच्या पत्नीच्या हवाले केलं. ज्यानंतर तिने त्याला चांगलीच मारहाण केली. या घटनेदरम्यान लोकांची चांगलीच गर्दी जमा झाली होती. नंतर स्थानिक लोकांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आलं.