'प्रेमात पडल्याने अभ्यास झाला नाही', विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिली प्रेमकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 09:31 AM2018-04-02T09:31:05+5:302018-04-02T09:31:30+5:30
परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्याने त्याची प्रेमकथा लिहिल्याची घटना घडली आहे.
मुझ्झफरनगर- परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्याने त्याची प्रेमकथा लिहिल्याची घटना घडली आहे. आयुष्यात त्याचं कुठल्या मुलीवर प्रेम आहे? हे सुद्धा या विद्यार्थ्याने उत्तकपत्रिकेत लिहिलं आहे. ''आय लव्ह माय पूजा" असं या विद्यार्थ्याने ठळक अक्षरात रसायनशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे. उत्तर प्रदेशाच इंटरमिडिएट परीक्षेतीली ही घटना आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
'ये मोहब्बद भी त्या चिज है, ना जिने देती है ना मरने... सर इस लव्ह स्टोरीने पढाई से दूर कर दिया वरना...' असं या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे. उत्तरपत्रिकेच्या पहिल्याच पानावर विद्यार्थ्याने या ओळी लिहून ह्रदयाचं चित्र काढलं आहे. बाकी संपूर्ण उत्तरपत्रिका कोरी आहे.
मुझ्झफरनगर जिल्हा शाळेचे निरिक्षक मुनेश कुमार यांनी सांगितलं की. काही मुलांनी उत्तरपत्रिकेवर नोटा स्टेपलर करून दिल्या. तसंच काही उत्तरपत्रिकांवर विचित्र मेसेजही लिहिण्यात आले आहे. 'सरांना पेपर उघडण्याआधी नमस्कार. सर पास करून टाका, असे मेसेज विद्यार्थ्यांनी लिहिलं आहेत. परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांनी भावूक मेसेजही लिहिले आहेत. तर काहींनी धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. 'मला आई नाहीये. मी नापास झालो तर वडिल मला मारून टाकतील', 'नापास केलं तर मी आत्महत्या करीन', असंही विद्यार्थ्यांनी लिहिलं आहे. शिक्षकांची सहानुभूती मिळविण्यासाठी विद्यार्थी असं करतात, असं एका शिक्षिकेने सांगितलं.