श्रीमंत पुरूषांसोबत लग्न कसं कराल? तरूणींना 'या' गोष्टी शिकवून केली १६३ कोटी रूपयांची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 03:11 PM2024-07-15T15:11:45+5:302024-07-15T15:12:35+5:30

या महिलेचं नाव ले चुआनकू आहे. ती सोशल मीडियावरून महिलांना रिलेशनशिपचे सल्ले देते त्यामुळे तिला लव्ह गुरू म्हणून ओळखलं जातं. तिचे खूपसारे फॉलोअर्स आहेत. 

Female love guru teaches woman how to marry rich men, earns 163 crore a year in China | श्रीमंत पुरूषांसोबत लग्न कसं कराल? तरूणींना 'या' गोष्टी शिकवून केली १६३ कोटी रूपयांची कमाई!

श्रीमंत पुरूषांसोबत लग्न कसं कराल? तरूणींना 'या' गोष्टी शिकवून केली १६३ कोटी रूपयांची कमाई!

वेगवेगळ्या हिंदी सिनेमांमध्ये तुम्ही लव्ह गुरू असं कॅरेक्टर नक्कीच पाहिलं असेल. अशीच एक महिला लव्ह गुरू सध्या चर्चेत आली आहे. ही एक वादग्रस्त लव्ह गुरू आहे जी तरूणींना शिकवते की, श्रीमंत पुरूषांसोबत लग्न कसं करावं. श्रीमंत पुरूषांसोबत लग्न कसं करावं हे शिकवून ही महिला वर्षाला १६३ कोटी रूपये कमाई करत आहे. ही घटना चीनमधील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव ले चुआनकू आहे. ती सोशल मीडियावरून महिलांना रिलेशनशिपचे सल्ले देते त्यामुळे तिला लव्ह गुरू म्हणून ओळखलं जातं. तिचे खूपसारे फॉलोअर्स आहेत. 

असं सांगितलं जातं की, तिचे सल्ले नेहमीच वादात सापडतात. कारण तिचे सल्ले असे असतात जे अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देतात. ती लग्न किंवा नात्यांना पैसे मिळवण्याचं एक साधन म्हणून बघते आणि इतर महिलांना सुद्धा तसंच शिकवते. तिच्या व्हिडीओमध्ये तिने सांगितलं आहे की, "कोणत्याही नात्याचा लाभ हा देण्या-घेण्यावर आधारित आहे. प्रत्येक गोष्टीचा वापर हा आपल्याला सशक्त बनवण्यासाठी केला पाहिजे".

चुआनकू लाईव स्ट्रीम दरम्यान एका सल्ला देण्यासाठी १२ हजार ९४५ रूपये घेते. तिच्या सगळ्यात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या कोर्सची फी ही ४३, १७९ हजार रूपये आहे. तसेच ती खाजगी क्लाससाठी दर महिन्याला १,१६, ९२७ रूपये फी घेते. सोशल मीडियावर व्हिडीओ करण्यासोबतच ती अनेक सेमिनारही घेत आहे. ती यात लोकांना डेटिंगच्या टिप्स देत असते. नेहमीच वादग्रस्त ठरत असल्याने तिला चीनमधील सोशल मीडिया वीबोवर बॅन करण्यात आलं आहे. 

Web Title: Female love guru teaches woman how to marry rich men, earns 163 crore a year in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.