कैद्याला आपले अश्लील फोटो पाठवत होती महिला पोलीस, त्या बदल्यात घेत होती पैसे...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:16 PM2023-03-01T15:16:49+5:302023-03-01T15:18:30+5:30
जेव्हा फोन चेक केला तेव्हा त्यात रेचलचे अनेक अश्लील फोटो होते. नंतर या गोष्टीचा खुलासा झाला की, रेचल त्याला फोटो पाठवण्याच्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घेत होती.
तुम्ही सिनेमांमध्ये पाहिलं असेल की, कशाप्रकारे कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचतात आणि कसे ते तुरूंगातून त्यांचे गुन्हे कसे करतात. पण खरंच असं होत असतं का? सगळ्याच तुरूंगात असं होत असेल याचा दावा केला जाऊ शकत नाही. पण ब्रिटनमध्ये घडलेली एक घटना सगळ्यांनाच हैराण करणारी आहे. इथे कैद्यांकडे फोन तर सापडलेच सोबतच त्यांच्या फोनमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे अश्लील फोटोही सापडलेत. जे बघून सगळेच हैराण झाले.
डेली स्टारनुसार 25 वर्षीय रेचल मार्टिन (Rachel Martin) HMP Guys Marsh मध्ये गार्ड होती आणि तिथे तिचं अफेअर 40 वर्षीय एका कैद्यासोबत सुरू झालं. त्याचं नाव रेमंड अब्राहम (Raymond Abraham) होतं. हैराण करणारी बाब म्हणजे रेचलला अब्राहमचं एक मोठं गुपित माहीत होतं. पण तरी तिने कुणाला सांगितलं नाही.
जेव्हा फोन चेक केला तेव्हा त्यात रेचलचे अनेक अश्लील फोटो होते. नंतर या गोष्टीचा खुलासा झाला की, रेचल त्याला फोटो पाठवण्याच्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घेत होती. हेच नाही तर ती महिलांचे अंडरगार्मेंट्सही त्याला सप्लाय करत होती.
बॉर्नमाउथ क्राउन कोर्टाने याचा खुलासा करत सांगितलं की, दोघांचं नातं 1 नोव्हेंबर 2020 ते 8 मार्च 2021 पर्यंत सुरू होतं. यादरम्यान ती त्याच्याकडून पैसे घेत होती. बॅंक अकाऊंट चेक केलं तर तव्हा समजलं की, महिलेने एकूण 12 लाख रूपये फोटोंच्या बदल्यात घेतले होते.
या पैशातून महिलेने तिच्यासाठी महागड्या वस्तू खरेदी केल्या. फेब्रुवारी 2021 मध्ये महिलेच्या महागड्या वस्तूंवरून तिच्यावर पोलिसांना संशय आला. त्यांनी झडती घेतली आणि तिच्या कोटमध्ये रोमान्ससाठी वापरण्यात येणारी मशीन सापडली.
3 दिवसांनंतर पोलिसांनी अब्राहमची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे फोन, दोन यूएसबी स्टीक आणि एक एसडी कार्ड सापडलं. ज्यात रेचलचे फोटो होते. मार्टिनने त्या दिवशी तब्येत बरी नसल्याचं कारण सांगत सुट्टी घेतली आणि दोन दिवसांनी राजीनामा दिला.
पण एप्रिल 2021 मध्ये पोलिसांनी तिच्या घरावर छापा मारला तेव्हा त्यांना तीन लाख रूपये कॅश सापडली. तिच्याकडील फोनमध्ये दोघांचे अश्लील फोटोही होते. त्यावरून समजलं की, रेचल अब्राहमकडून पैसे घेत होती. त्यानंतर रेचलला 16 महिन्यांचा तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि अब्राहम आधीपासून 10 वर्षाची शिक्षा भोगत आहे.