महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 09:28 AM2022-11-08T09:28:07+5:302022-11-08T09:32:10+5:30

Strange Love Story: मीरा भरतपूरच्या एका राजकीय माध्यमिक विद्यालयात पीटीची शिक्षिका म्हणून काम करत होती. कल्पना नावाची विद्यार्थिनी याच विद्यालयात शिकत होती.

Female teacher married school girl in Rajasthan after change gender | महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

googlenewsNext

Strange Love Story: प्रेम आंधळं असतं, असं का म्हटलं जातं याचं उदाहरण असलेली एक घटना समोर आली आहे. एका स्कूल टीचरने आपल्याच विद्यार्थिनीसोबत लग्न केलं. यासाठी महिला टीचरने आपला जेंडर चेंड करण्यासाठी सर्जरी केली. राजस्थानच्या  भरतपूरमध्ये झालेल्या या अनोख्या लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. 

मीरा भरतपूरच्या एका माध्यमिक विद्यालयात पीटीची शिक्षिका म्हणून काम करत होती. कल्पना नावाची विद्यार्थिनी याच विद्यालयात शिकत होती. कल्पना एक चांगली कबड्डी खेळाडू आहे आणि तीन वेळा तिने राष्ट्रीय स्तरावरही कबड्डी खेळली आहे. मीराला कल्पनाचा खेळ आवडत होता. हेच कारण होतं की, टीचर मीरा कल्पनाच्या प्रेमात पडली. टीचरने मीरासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर कल्पनानेही आपलं उत्तर दिलं. दोघींचं प्रेम चांगलंच फुललं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

लग्नाचा निर्णय घेतल्यावर मीराने पुढाकार घेतला आणि आपला जेंडर चेंज करण्याचं ठरवलं. यासाठी तिने सर्जरी केली. सर्जरीनंतर मीरा आरव बनली. नंतर दोघांनी आनंदाने लग्न केलं. महत्वाची बाब म्हणजे यात दोघींच्याही परिवाराने विरोध केला नाही. आरवला चार मोठ्या बहिणी आहेत आणि चौघींचंही लग्न झालं आहे.

आधी मीरा आणि आताचा आरवला महिला कोट्यातून एका सरकारी स्कूलमध्ये टीचरची नोकरी मिळाली होती. मीराची कल्पनासोबत ओळख स्कूलमध्येच झाली होती. कल्पनानेही जेंडर चेंज करण्याचं समर्थन केलं होतं. पण आता आरव म्हणाला की, नोकरीमध्ये नाव आणि जेंडर चेंज केल्याने त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

या लग्नाबाबत आरवच्या वडिलांनी रिअॅक्शन आली आहे. ते म्हणाले की, मला पाच मुली आहेत. सगळ्यात मीरा एक मुलगी होती. पण ती बालपणापासून एका मुलासारखीच राहत होती. मुलांसोबतच खेळत होती. आता मी आनंदी आहे की, ती एक मुलगा झाली आहे आणि त्याचं लग्नही झालं.

Web Title: Female teacher married school girl in Rajasthan after change gender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.