बॉयफ्रेन्डने गर्भवती गर्लफ्रेन्डला दिला दगा; मोठ्या बहिणीसोबत अफेअर अन् पाच मुलंही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:54 PM2020-03-16T12:54:09+5:302020-03-16T13:00:36+5:30
तिचा होणारा नवरा आणि तिच्या मोठ्या बहिणीत अनेक वर्षांपासून संबंध आहेत तेव्हा तिला धक्का बसला.
ब्रिटनच्या साउथ लंडनमधील एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. इथे एक गर्भवती तरूणी तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. अशातच तिला कळाले की, तिचा होणारा नवरा आणि तिच्या मोठ्या बहिणीत अनेक वर्षांपासून संबंध आहेत तेव्हा तिला धक्का बसला. दोघांमध्ये केवळ संबंधच नाही तर तिला असेही समजले की, तिच्या बहिणीच्या ५ मुलांचा वडील तिचा होणारा नवरा म्हणजे तिचा बॉयफ्रेन्ड आहे.
साउथ लंडनमध्ये राहणारी शार्लेट क्लार्क आणि गॅरी बॅनिस्टर लग्नाच्या तयारीत बिझी होते. तेव्हाच शार्लेटला फेसबुक मेसेजच्या माध्यमातून समजले की, तिची बहीण रेबेका आणि बॉयफ्रेन्ड यांच्यात संबंध आहेत. पण यातही एक ट्विस्ट आहे. दोघांनाही शार्लेटने माफही केलं.
(Image Credit : dailystar.co.uk)
शार्लेटने दोघांना केवळ माफ केलं नाही तर आता संपूर्ण परिवार एकत्र राहत आहे. शार्लेटचं म्हणणं आहे की, आता तिला त्याचा राग येत नाही आणि आपल्या बाळाच्या संगोपनासाठी तिला हेच योग्य वाटलं. त्यामुळे ते सर्व आता एकत्र राहणार आहेत.
काय आहे प्रकरण?
शार्लेटने डेली स्टारला सांगितले की, तिची भेट गॅरीसोबत २००५ मध्ये झाली होती. गॅरी एका पबमध्ये शेफ होता आणि त्यादरम्यान त्याला आधीच्या रिलेशनमधून दोन मुलेही होती. नंतर गॅरी आणि शार्लेट सोबत राहू लागले. त्यांना एक बाळही झालं. नंतर त्यांनी २०१० मध्ये साखरपुडाही केला.
(Image Credit : dailystar.co.uk)
दरम्यान आपल्या पर्सनल लाइफमध्ये काही अडचणी असल्याने शार्लेटने तिची बहीण रेबेकाला घरी राहण्यासाठी बोलवून घेतलं. सुरूवातीला रेबेकाला गॅरी पसंत नव्हता. दोघे एकमेकांसोबत बोलतही नव्हते. शार्लेटने सांगितले की, २०१० मध्ये दोघांचं वागणं एकाएकी बदललं आणि ज्यामुळे मी आनंदी होते.
भांडाफोड कसा झाला?
शार्लेटने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिने गॅरी आणि रेबेकाचं फेसबुक चॅटींग वाचलं आणि ती हैराण झाली. त्यानंतर शार्लेटने लग्न मोडलं आणि ती बहीण रेबेकासोबतही बोलत नव्हती. गॅरीने रेबेकासोबत २०१७ मध्ये लग्नही केलं होतं आणि त्यांना ५ मुलं आहेत. यावर शार्लेट म्हणते की, 'मला त्यावेळी फार वाईट वाटलं होतं. पण आता वाटतं की, हे दोघेच माझा परिवार आहेत आणि त्यामुळे मी त्यांचा स्वीकार केला.