दोन फायटर पायलट्सचा खळबळजनक दावा, आकाशात UFO सोबत झाली लढाई; पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:22 AM2023-05-25T09:22:32+5:302023-05-25T09:24:36+5:30

आता एका टीव्ही डॉक्युमेंट्रीमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोन फायटर पायलट्सनी UFO ला उडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या UFO ना काही फरकच पडत नव्हता. 

Fighter pilots shocking revelations tried to shoot down ufo in mid air aliens | दोन फायटर पायलट्सचा खळबळजनक दावा, आकाशात UFO सोबत झाली लढाई; पण....

दोन फायटर पायलट्सचा खळबळजनक दावा, आकाशात UFO सोबत झाली लढाई; पण....

googlenewsNext

UFO आणि एलिअन्सबाबत सतत काहीना काही दावे केले जात असतात. पण आजपर्यंत ते सिद्ध करता आलेले नाहीत. पण हैराण करणारी बाब म्हणजे दावे करणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांसोबतच सैनिक आणि पायलटही आहेत. आता एका टीव्ही डॉक्युमेंट्रीमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोन फायटर पायलट्सनी UFO ला उडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या UFO ना काही फरकच पडत नव्हता. 

यावरून हे वाटतं की, त्यांना नष्ट करता येत नाही. त्यांच्यावर ना मिसाइलने काम केलं, ना दुसऱ्या गोष्टींनी. उलट ते दुरूनच एखादी गोष्ट कंट्रोल करू शकतात. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, यातील एका पायलटने सांगितलं की, त्याने आगीची भिंत पाहिली. जी उडणाऱ्या रहस्यमय वस्तुसमोर येणारी कोणतीही गोष्ट रोखत होती.

पायलट म्हणाला की, त्याने जे मिसाइल UFO कडे फायर केले, ते त्या UFO मध्ये सामावून गेले. त्यांनी 50 किमी पाठलाग केला आणि कोणत्याही नुकसानाशिवाय गायब झालं.

एका दुसऱ्या पायलटने हवेतच UFO चा खात्मा करण्याचा प्रयत्न केला. ते केवळ 8 हजार मैल अंतरावर होतं. पायलट म्हणाला की, त्याचे जेट कंट्रोल जाम झाले होते. पण UFO तिथून गायब झाल्यावर जेटने पुन्हा काम करणं सुरू केलं होतं.

पायलट्सच्या या लढाईबाबत नॅशनल जिओग्राफीच्या 'Investigating The Unknown' डॉक्युमेंट्रीमध्ये सांगण्यात आलं. दरम्यान असे दावे याआधीही अनेकदा करण्यात आले. पण ते सिद्ध करता आले नाहीत किंवा काही पुरावे सापडले नाहीत.

याआधी दावा करण्यात आला होता की, UFO ने एका प्रवाशाचा 50 मिनिटे पाठलाग केला होता. UFO विमान अलास्कामध्ये लॅंड झाल्यानंतर अचानक गायब झालं होतं. पण याचेही काही पुरावे नाहीत.

Web Title: Fighter pilots shocking revelations tried to shoot down ufo in mid air aliens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.