जगातल्या सर्वात विषारी कोब्राला किस करत होता सापांचा एक्सपर्ट, २ मिनिटांमध्ये झाला त्याचा खेळ खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:32 PM2021-07-16T12:32:28+5:302021-07-16T12:36:27+5:30

कोब्राने त्याना दंश मारला आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला. नंतर संतापलेल्या लोकांना सापाचा जीव घेतला. ज्या कोब्राने एक्सपर्टला दंश मारला तो जगातली सर्वात विषारी कोब्रा मानला जातो.

Filipino ‘Snake Man’ who claimed he was immune to venom dies after cobra bit him | जगातल्या सर्वात विषारी कोब्राला किस करत होता सापांचा एक्सपर्ट, २ मिनिटांमध्ये झाला त्याचा खेळ खल्लास

जगातल्या सर्वात विषारी कोब्राला किस करत होता सापांचा एक्सपर्ट, २ मिनिटांमध्ये झाला त्याचा खेळ खल्लास

googlenewsNext

साप पकडणं किंवा पाळणं हे फारच धोकादायक काम आहे. सामान्यपणे सापाच्या दंशाचा सर्पमित्रांवर किंवा एक्सपर्टवर काही प्रभाव दिसून येत नाही. कारण त्यांना विषाच्या अॅंटीडॉटची माहिती असते. पण ही फिलिपिन्सच्या एका सापाच्या एक्सपर्टबाबत चुकीची ठरली आहे. पंगासिनान प्रांतातील एक्सपर्टने गर्दी समोर कोब्रा सापाला किस करण्याचा प्रयत्न केला. पण कोब्राने त्याना दंश मारला आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला. नंतर संतापलेल्या लोकांना सापाचा जीव घेतला. ज्या कोब्राने एक्सपर्टला दंश मारला तो जगातली सर्वात विषारी कोब्रा मानला जातो.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, ६२ वर्षीय बर्नाडो अल्वारेज सापांचे एक्सपर्ट होते. त्यांचा दावा होता की, ते सापांच्या विषाने 'इम्यून' आहे. हे म्हणत त्यांनी एक कोब्रा उचलला होता आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करत होते. कोब्राला ते आपल्या तोंडाजवळ घेऊन गेले आणि तेव्हाच कोब्राने त्यांच्या जीभेवर दंश मारला. अल्वारेज जागेवरच खाली पडले आणि वेदनेने ओरडू लागले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. (हे पण वाचा : हळद झाल्यावर झोपायला गेलेल्या नव्या नवरीला सापाने मारला दंश, संसार सुरू होण्याआधीच संपला....)

अल्वारेज यांच्या बहिणीने सांगितलं की, त्यांच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण उत्तर फिलिप कोब्राचं विष घातक होतं. हेल्थ ऑफिसर डॉ. ऐना डी गजमन यांच्यानुसार सापाच्या विषामुळे अल्वारेज यांना लखवा मारला होता. त्यामुळे ते श्वास घेऊ शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांचं हृदय बंद पडलं.

उत्तर फिलीप कोब्राची लांबी सरासरी १ मीटर असते १.६ मीटरपर्यंत हे साप लांब असू शकतात. हे साप ३ मीटर अंतरापर्यंत विषाने निशाणा साधू शकतात. यांच्या दंशामुळे डोकेदुखी, चक्कर, उलटी, पोटात वेदना, डायरिया आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. या सापाने दंश मारल्यावरर ३० मिनिटांच्या आत जीव जाऊ शकतो. 
 

Web Title: Filipino ‘Snake Man’ who claimed he was immune to venom dies after cobra bit him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.